JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ब्रिटनच्या शाही घराण्यातील आहे सनी देओलची पत्नी पूजा! लपून केलं लग्न आणि 'त्या' फोटोमुळं समोर आलं सत्य

ब्रिटनच्या शाही घराण्यातील आहे सनी देओलची पत्नी पूजा! लपून केलं लग्न आणि 'त्या' फोटोमुळं समोर आलं सत्य

अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल नुकताच लग्नबंधनात अडकला. 18 जून रोजी त्यानं गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यबरोबर लग्नगाठ बांधली. सनी देओलही पत्नी पूजा देओलसोबत लग्नात खूप सेलिब्रेशन करताना दिसला होता.

जाहिरात

पूजाचे खरे नाव लिंडा देओल आहे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जून - अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल नुकताच लग्नबंधनात अडकला. 18 जून रोजी त्यानं गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यबरोबर लग्नगाठ बांधली. करण आणि द्रिशा यांचं पंजाबी पद्धतीनं मोठ्या थाटामाटात लग्न लागलं. जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थित दोघांचं लग्न पार पडलं. संगीत सोहळ्यापासून लग्नापर्यंत सगळ्या विधी साग्रसंगीत पार पडल्या. संपूर्ण देओल फॅमिली करणच्या लग्नात एन्जॉय करताना दिसली. अभिनेते धर्मेंद्रही नातवाच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत प्रत्येक क्षण एन्जॉय करताना दिसले.सनी देओलही पत्नी पूजा देओलसोबत लग्नात खूप सेलिब्रेशन करताना दिसला होता. अलीकडेच दोघेही त्यांच्या मुलाच्या लग्नात चांगलेच मग्न झालेले दिसले. पण दोघांचे नातेही रोलर कोस्टर राईडपेक्षा कमी राहिलेले नाही. सनी देओलने 1983 मध्ये बेताब या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. सनी देओलने आपल्या पहिल्याच चित्रपटाने धुमाकूळ घातला. बॉलिवूडमध्ये स्टार बनण्याच्या वेळी सनी देओलने लंडनमध्ये गुपचूप लग्न केले. स्टार बनल्यानंतर सनी देओल अनेक वर्षे आपल्या लग्नाच्या बातम्यांचे खंडन करत राहिला. दरम्यान, सनी देओलच्या त्याच्या हिरोईनसोबतच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या. अफेअरची बातमी येताच सनी देओल आणि त्याची पत्नी पूजा देओल यांच्या नात्यात अनेक चढउतार आले. सनी देओलची पत्नी पूजा देओल ब्रिटनची रहिवासी होती आणि तिचे खरे नाव लिंडा देओल आहे. पूजा देओलचा जन्म 21 सप्टेंबर 1957 रोजी इंग्लंडमध्ये झाला. वाचा- लग्नाच्या चार महिन्यात Kiara Advani प्रेग्नेंट? लेटेस्ट फोटोमध्ये दिसला बेबी बंप पूजाचे खरे नाव लिंडा देओल आहे पूजाची आई सारा महल एक ब्रिटिश महिला होती आणि ब्रिटनमधील शाही कुटुंबातील होती. राजघराण्यातील पूजा देओलवरही मीडियाने बारकाईने लक्ष ठेवले होते. अमृता सिंग आणि डिंपल कपाडियासोबत सनी देओलच्या अफेअरची बातमी समोर आल्यावर सनी देओलच्या वैवाहिक आयुष्यातही खळबळ उडाली होती.

काही काळानंतर सर्व काही ठीक झाले. आज दोघेही आनंदाने जगत आहेत. पूजा देओलही चित्रपटांशी संबंधित आहे आणि लेखिका म्हणून काम करते. पूजा देओलने अनेक चित्रपटांच्या कथाही लिहिल्या आहेत. पूजा लाइमलाइटपासून दूर राहते आणि कधीच मीडियासमोर येत नाही. अलीकडेच त्यांचा मुलगा करणच्या लग्नात दोघे उत्साही दिसले. सोशल मीडियावरही त्याची छायाचित्रे व्हायरल झाली होती. चाहत्यांनी पूजा देओलच्या सौंदर्याची जोरदार प्रशंसा केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या