JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Besharam Rang : पठाणचे 'बेशरम रंग' हे पाकिस्तानी गाण्याची कॉपी? गायकाने व्हिडीओ शेअर करत केला आरोप

Besharam Rang : पठाणचे 'बेशरम रंग' हे पाकिस्तानी गाण्याची कॉपी? गायकाने व्हिडीओ शेअर करत केला आरोप

बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे.

जाहिरात

बेशरम रंग

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 जानेवारी : बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण स्टारर ‘पठाण’ चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातील भगव्या बिकीनीमुळे हा संपूर्ण वाद उफाळला असून या चित्रपटाचा तीव्र निषेध केला जात आहे. त्यामुळे हा चित्रपट सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. गाण्यावरून सुरू असलेला वाद संपण्याचे नाव घेत नाहीये. अशातच बेशरम गाण्यावर पाकिस्तानी गायकाने आक्षेप घेतला आहे. गायकाने यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. पाकिस्तानी गायक सज्जाद अलीने नाव न घेता ‘बेशरम रंग’वर निशाणा साधला आहे. ‘बेशरम रंग’ हे त्याच्या ‘अब के हम बिछडे’ या जुन्या गाण्यासारखेच असल्याचे तो म्हणतो. खरं तर, सज्जाद अलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतोय की त्याने आगामी चित्रपटातील एक गाणे ऐकले, ज्यावरून त्याला त्याने वर्षांपूर्वी लिहिलेल्या गाण्याची आठवण झाली. गायक सज्जाद अलीने शेअर केलेला व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रियाही उमटत आहे.

संबंधित बातम्या

गायकाने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत बेशरम रंग गाण्यासारखं गाणं वाटत असल्याचं बोलत आहे. पाकिस्तानी इंडस्ट्रीकडून बॉलिवूडवर असा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा पाकिस्तानी गायकांनी बॉलिवूडवर गाण्यांचा सूर चोरल्याचा आरोप केला आहे. सध्या ‘पठाण’ चित्रपटाचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालल्याचा पहायला मिळत आहे.

दरम्यान, ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे किंग खान बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण, जॉन इब्राहिम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या अॅक्शन थ्रीलर चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. हा चित्रपच प्रदर्शित झाल्यावक लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या