JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Pathaan Movie: शाहरुख खानने स्टेजवरच जॉनसोबत केलं असं कृत्य, पुन्हा-पुन्हा पाहिला जातोय 'तो' VIDEO

Pathaan Movie: शाहरुख खानने स्टेजवरच जॉनसोबत केलं असं कृत्य, पुन्हा-पुन्हा पाहिला जातोय 'तो' VIDEO

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी एक मेजवानीच आहे असं म्हणावं लागले. कारण अभिनेत्याने तब्बल चार वर्षांच्या विश्रांतीनंतर पडद्यावर पुनरागमन केलं आहे.

जाहिरात

शाहरुख खान-जॉन अब्राहम वाद

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 जानेवारी- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान चा ‘पठाण’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी एक मेजवानीच आहे असं म्हणावं लागले. कारण अभिनेत्याने तब्बल चार वर्षांच्या विश्रांतीनंतर पडद्यावर पुनरागमन केलं आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून छप्परतोड कमाईला सुरुवात केली आहे. चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर कमाईचा 500 कोटींचा टप्पा गाठला आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. नुकतंच या कलाकारांनी चित्रपटाच्या सक्सेसनंतर एक पत्रकार परिषद केली. यामध्ये शाहरुख खानने जॉन अब्राहमसोबत असं काही केलं की तो व्हिडीओ आता चर्चेत आला आहे. शाहरुख खान गेली चार वर्षे पडद्यापासून दूर होता. त्याचे चाहते त्याच्या पुनरागमची आतुरतेने वाट पाहात होते. अभिनेत्याने ‘पठाण’मधून कमबॅक करत चाहत्यांना खुश केलं आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागून होती. अखेर 25 जानेवारीला हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाने रिलीजपूर्वीच ऍडव्हान्स बुकिंगचे अनेक रेकॉर्ड्स मोडले होते. त्यांनतर आता चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने ग्रँड ओपनिंग करत पाच दिवसांत 500 कोटींचा आकडा गाठला आहे. **(हे वाचा:** Ved Box Office Collection: भावा तूच! ‘पठाण’च्या धमाक्यात ‘वेड’ची क्रेझ कायम; चौथ्या आठ्वड्यात कमाईचा आकडा थक्क करणारा ) या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेता जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण झळकले आहेत. दीपिका आणि शाहरुखची केमिस्ट्री प्रत्येकालाच माहिती आहे. ते दोघे एकमेकांच्या फारच जवळ आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून जॉन अब्राहम आणि शाहरुख खानमध्ये खटकल्याचं सांगितलं जात होतं. जॉन शाहरुखवर नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. एका मुलाखतीदरम्यान जॉनला पठाणबाबत प्रश्न विचारला असता त्याने त्याच उत्तर देण्याचं टाळत थेट उठून जाणं पसंत केलं होतं. त्यामुळे या बातम्यांना आणखीनच हवा मिळाली होती.

संबंधित बातम्या

दरम्यान आता या चित्रपटाच्या रिलीजनंतर चित्रपटाच्या टीमने एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. यादरम्यान जॉन पठाणबाबत आपला अनुभव शेअर करत होता. अशातच शाहरुखने येऊन त्याला गालावर किस केलं. हे पाहून जॉन लाजला. आणि म्हणाला माझ्यासोबत हे पहिल्यांदाच घडतंय आणि मी पहिल्यांदा इतका लाजत आहे. या सर्व प्रकारानंतर शाहरुख आणि जॉनमध्ये सगळंकाही ठीक असल्याचं स्पष्ट झालं आहे.

पठाण या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गे गाणं रिलीज झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. त्यांनतर हाय कोर्टाने चित्रपटामध्ये काही बदल सुचविले होते. ते बदल करून चित्रपट रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख खानचा हा दमदार कमबॅक असल्याचं म्हटलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या