शाहरुख खान
मुंबई,13 जानेवारी- बॉलिवूड किंग म्हणून शाहरुख खान ला ओळखलं जातं. देशातच नव्हे तर जगभरात शाहरुख खानचा मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या चार वर्षांपासून अभिनेता पडद्यापासून दूर आहे. त्यामुळे त्याचे चाहते त्याला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान अभिनेता ‘पठाण’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहरुख खान सध्या आपल्या या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात अडकला आहे. तर दुसरीकडे चित्रपटाच्या गाण्याने नवा रेकॉर्ड केला आहे. शाहरुख आणि दीपिकाला पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. शाहरुख खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत विविध मार्गाने आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. शाहरुख आपल्या खास अंदाजात चाहते आणि ट्रोलर्सना उत्तरे देत असतो. दरम्यान ‘पठाण’ च्या रिलीजपूर्वी शाहरुख खान पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. नुकतंच अभिनेत्याने सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधला. अभिनेत्याने ट्विटरवर #AskSRK हा सेशन केला. यामध्ये अनेक चाहत्यांनी शाहरुख खानला मजेशीर प्रश्न विचारले होते. अभिनेत्यानेसुद्धा त्यांना हटके अंदाजात उत्तरे देत सर्वांचं मन जिंकलं आहे. **(हे वाचा:** Genelia Deshmukh: जिनिलियाला आहे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचं वेड; सासूबाईंच्या हातचे ‘हे’ पदार्थ आहेत फेव्हरेट ) शाहरुख खानने पठाणसाठी घेतली इतकी फी? शाहरुख खानने ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी आस्क एसआरके हा सेशन घेतला. यामध्ये अभिनेत्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान एका युजरने अभिनेत्याला विचारलं, ‘पठाणसाठी तुम्ही किती फी घेतली’? यावर शाहरुखने आपल्या मजेशीर अंदाजात उत्तर देत म्हटलं ‘का पुढच्या चित्रपटात साइन करायचं आहे का?’ अशी अनेक मजेशीर प्रश्न आणि उत्तरे काल ट्विटरवर पाहायला मिळाली.
अभिनेत्याने किती दिवसांत बनवली बॉडी? शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचा पहिला पोस्टर समोर येताच त्याचे चाहते थक्क झाले होते. 56 वर्षांचा शाहरुखने या वयातही अगदी तरुणांना लाजवेल अशी बॉडी केली आहे. अभिनेत्याचा हा रावडी अंदाज सर्वांनाच पसंत पडला होता. दरम्यान ट्विटरवरील सेशनमध्ये एका युजरने शाहरुख खानला विचारलं की, ‘ही बॉडी करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला? यावर उत्तर देत शाहरुखने सांगितलं, ‘मला वाटतं मला यासाठी जवळजवळ सहा महिने लागले आहेत’. अर्थातच अभिनेत्याच्या सहा महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर ही बॉडी कमावली आहे.
येत्या 25 जानेवारीला शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रचंड चर्चेत आहेत. दरम्यान हा चित्रपट आपल्या ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे वादातसुद्धा अडकला आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण रोमान्स आणि ऍक्शन करताना दिसून येणार आहे.