JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Code Name Tiranga Collection: परिणीती चोप्राचे 11 वर्षात 9 फ्लॉप चित्रपट; 'कोड नेम तिरंगा' वर भविष्य अवलंबून

Code Name Tiranga Collection: परिणीती चोप्राचे 11 वर्षात 9 फ्लॉप चित्रपट; 'कोड नेम तिरंगा' वर भविष्य अवलंबून

परिणीती चांगली अभिनेत्री आहे. तीने आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत. पण परिणीती तिच्या पात्रांना न्याय देऊ शकली नाही. त्यामुळे तिचे भविष्य तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कोड नेम तिरंगा या चित्रपटावर अवलंबून आहे.

जाहिरात

परिणीती चोप्रा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने 11 वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिने पदार्पणातच आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला. पण आजही ती बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. तिची चुलत बहीण प्रियांका सध्या  ग्लोबल स्टार बनली आहे. पण परिणीती अजूनही चित्रपटसृष्टीत टिकण्यासाठी संघर्षच करत आहे.  परिणीती चोप्राला बऱ्याच दिवसांपासून एकही हिट चित्रपट मिळालेला नाही. आता तिचा कोड नेम तिरंगा हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाच्या कामगिरीवर तिचं भविष्य अवलंबून आहे. तिच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली आहे पाहा. परिणीतीच्या करिअरला चालना देण्यासाठी कोड नेम तिरंगा खूप महत्त्वाचा आहे. परिणीतीचे सलग 4 चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. परिणीती चांगली अभिनेत्री आहे.  तीने आजपर्यंत  वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत. सायना नेहवालच्या बायोपिक, द गर्ल ऑन द ट्रेन असा  दमदार भूमिका तिला  मिळाल्या आहेत. पण परिणीती तिच्या पात्रांना न्याय देऊ शकली नाही. त्यामुळे तिचे भविष्य तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कोड नेम तिरंगा या चित्रपटावर अवलंबून आहे. हेही वाचा - बॉईज 3 च्या दणदणीत यशानंतर आता बॉक्स ऑफिसवर बॉईज 4 घालणार राडा परिणीती चोप्रा आणि गायक-अभिनेता हार्डी संधू यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘कोड नेम तिरंगा’ या चित्रपटाने शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये चांगलीच कमाई केली. या देशभक्तीपर चित्रपटाला  पहिल्याच दिवशी सुमारे ₹15 लाखांची ओपनिंग मिळाली. आयुष्मान खुरानाच्या कॅम्पस कॉमेडी ‘डॉक्टर जी’सोबत हा चित्रपट प्रदर्शित झाला. डॉक्टरजींना पहिल्या दिवशी सुमारे ₹3.25 कोटींची ओपनिंग मिळाली.

संबंधित बातम्या

कोड नेम तिरंगा हा चित्रपट रिभू दासगुप्ता यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात शरद केळकर, रजित कपूर, शेफाली शाह, दिव्येंदू भट्टाचार्य, शिशिर शर्मा आणि सब्यसाची चक्रवर्ती यांच्याही भूमिका आहेत. Boxofficeindia.com वरील अंदाजानुसार, पहिल्या दिवशी ₹100 च्या स्वस्त तिकीट दर असूनही चित्रपटाने ₹10-15 लाखांची कमाई केली आहे. परिणीतीने ‘कोड नाम तिरंगा’ मध्ये दुर्गा नावाच्या गुप्त RAW एजंटची भूमिका केली आहे, जो तिचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ दिग्दर्शक रिभू दासगुप्तासोबतचा दुसरा चित्रपट आहे.

तिने पीटीआयला एका मुलाखतीत सांगितले होते  की, “हा माझ्या आयुष्यातील एक नवीन टप्पा आहे, परिणिती 2.0. माझ्यासाठी हा चित्रपट (कोड नेम: तिरंगा) त्या युगाचा एक भाग आहे जिथे मी लहानाची मोठी झाली. जर शेवटच्या तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नसली, जरी प्रेक्षकांना ते चित्रपट आवडले नसले तरी या चित्रपटाकडून मला खूप अपेक्षा आहेत.” परिणीती याआधी बॅडमिंटन चॅम्पियन सायनाच्या बायोपिकमध्ये  सायना नेहवालच्या भूमिकेत दिसली होती. कोड नेम तिरंगा मुख्यतः तुर्कीमध्ये शूट करण्यात आला आहे. आता हा चित्रपट परिणितीच्या करियरची बुडती नाव तारुण्यात यशस्वी ठरेल का ते बघणं महत्वाचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या