JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आता उर्मिला मातोंडकरने घेतली कंगनाची शाळा; Y प्लस सुरक्षेवर व्यक्त केला संताप

आता उर्मिला मातोंडकरने घेतली कंगनाची शाळा; Y प्लस सुरक्षेवर व्यक्त केला संताप

‘मॅडमना जी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती त्याचे पैसे कोण देतं…तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस….’

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 सप्टेंबर : कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन सध्या देशात मोठी चर्चा सुरू आहे. कंगना रणौतने बॉलिवूडबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. आता यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनेही उडी घेतली आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान उर्मिलाने कंगनाचा चांगलाच समाचार घेतला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिला वायप्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. गृहमंत्रालयाने दिलेल्या या सुरक्षेबाबत उर्मिला मातोंडकर हिने संताप व्यक्त केला आहे. यावेळी उर्मिला म्हणाली,  जनतेच्या पैशातून कंगनाला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी देण्यात आली. काही लोकांबद्दल मनात द्वेष आहे म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणं हे अतिशय चुकीचं आहे. मॅडमना जी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती त्याचे पैसे कोण देतं…तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस जो ‘अॅक्ट ऑफ गॉड’ म्हणून टॅक्सपासून पळून जाऊ शकत नाही. तो कसंही करुन टॅक्स भरतो. त्या करदात्यांच्या पैशातून कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली गेली…ती काय म्हणून देण्यात आली होती? असा सवाल उर्मिलाने उपस्थित केला आहे. हे ही वाचा- भाजपच्या संबित पात्रांनी विचारला POK चा Fullform; अभिनेत्रीला आलं नाही उत्तर यापुढे उर्मिला म्हणाली, कंगनाने तिच्याकडे माफियांची नावं असल्याचं सांगितलं होतं व त्यासाठी ती मुंबईत येऊन अमली पदार्थ विभागाला ते देणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र ही नावं देण्यासाठी मुंबईत येण्याची गरज नव्हती. इंटरनेट, फोनवरुनही नावं सांगता आली असती. आल्यानंतर नावं दिल्यावर पुढे काय झालं…त्यानंतर तर कंगनाबद्दल बोलणं मला गरजेचं वाटत नसल्याचंही ती यावेळी म्हणाली. एबीपीला दिलेल्या मुलाखतीत उर्मिलाने कंगनाला चांगलंच सुनावलं आहे. दरम्यान जया बच्चन आणि रवी किशन यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादात कंगनाने उडी घेत ट्विट केलं आहे. कंगना रणौतने ट्वीट करून जया बच्चन यांना तिखट भाषेत काही सवाल केले आहेत. तिने ट्वीट करून असे म्हटले आहे की, ‘जया जी, जर मी तुमची मुलगी श्वेता असते आणि टीनएजमध्ये तिला मारले असते, ड्रग दिले असते आणि तिच्याबरोबर छेडछाड झाली असती, तरी देखील तुम्ही असेच म्हटला असता का? जर अभिषेक सातत्याने गुंडगिरी आणि छळवणूक केल्याबद्दल तक्रार केली असती आणि एक दिवस गळफास घेतलेला आढळला असता तरी देखील तुम्ही असेच म्हटला असता का? आमच्याबद्दलही दया दाखवा’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या