मुंबई, 02 फेब्रुवारी: बॉलिवूडमधील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही (Bollywood Actress Nora Fatehi) तिच्या बोल्ड अंदाजासाठी, डान्स सीनसाठी कायमच चर्चेत असते. अगदी काही काळातच नोराने आपला डान्स, अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नोरा ही कमालीची डान्सर असून, तिचं कौशल्य वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळालं आहे. नोरा फतेही तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. यासोबतच तिचा ड्रेसिंग सेन्सही लाइमलाइटमध्ये असतो. नोराच्या बाबतीत एक धक्कादायक घटना घडली होती. नोराने एका मुलाखतीत त्याबाबतची माहिती सांगितली होती. एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान सर्व क्रू मेंबर्ससमोर नोरा फतेहीवर धक्कादायक प्रसंग ओढवला होता. शूटिंग सुरू असताना तिने जो ड्रेस घातला होता, तो अचानक खाली सरकला. त्या वेळी अभिनेत्री तमन्ना भाटिया धावली आणि तिने नोराला मदत केली. या घटनेची माहिती नोराने एका मुलाखतीमध्ये दिली. हे सांगत असताना ती खूप भावूक झाली होती. हे वाचा- नुसरत जहाँने पहिल्यांदाच सांगितलं यशदाससोबतच्या लग्नाचे सत्य, म्हणाली… या प्रसंगादरम्यान तमन्ना भाटियामुळे आपलं लज्जारक्षण झाल्याचं तिने मुलाखतीमध्ये सांगितलं. तसंच या मुलाखतीत नोराने तमन्ना भाटियाचे आभार मानले आणि आपण कायम तमन्ना भाटियाची ऋणी असल्याचं सांगितलं. खरं तर, असं काही घडण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीदेखील नोरा अनेकदा आपल्या कपड्यांमुळे ट्रोल झाली असून, तीला Oops मोमेंटचा (Nora Fatehi Oops Moment) सामना करावा लागला आहे.
नोरा आज बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. नोराने धमाकेदार आयटम साँग्ज करून बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. तिची आयटम साँग्ज खूप लोकप्रिय आहेत. ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातल्या ‘दिलबर’ या गाण्यामुळे नोरा विशेष प्रकाशझोतात आली होती. तिने आपल्या अदांनी चाहत्यांना भुरळ घातली होती. या गाण्याने सोशल मीडियावर सर्वांना वेड लावलं होतं. या गाण्यानंतर नोरा फतेहीने मागे वळून पाहिलं नाही आणि एकापेक्षा एक हिट गाणी दिली, तसंच चित्रपटांमध्ये काम केलं. तिने बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांसोबत काम केलं आहे. नोरा फतेहीने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सोशल मीडियावर नोराचं मोठं फॅन फॉलोइंग आहे.