नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर
मुंबई, 3 जुलै : भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा गुरू-शिष्य परंपरेद्वारे जपणाऱ्या कुटुंबाचा कार्यक्रम गुरूपौर्णिमेनिमित्त आयोजित सोहळ्याचा दुसऱ्या दिवशीचा प्रमुख कार्यक्रम होता. मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या जिओ वर्ल्ड सेंटरमधल्या ‘दी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’मध्ये हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ सरोदवादक पद्मविभूषण उत्साद अमजद अली खान, त्यांचे पुत्र अमान अली बंगश आणि अयान अली बंगश आणि झोहान आणि अबीर अली बंगश हे उस्तादांचे 10 वर्षांचे जुळे नातू अशा तीन पिढ्यांचं नीता अंबानी यांनी स्वागत केलं आणि या अत्यंत उत्तम अशा कलाकारांचं त्यांनी कौतुक केलं. ‘उस्ताद अमजद अली खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेलं सादरीकरण हे आयुष्याच्या उल्लेखनीय सिम्फनीचं प्रतिनिधित्व आहे. तीन असामान्य पिढ्यांनी एकत्र येऊन केलेलं हे सांगीतिक वारशाचं अप्रतिम सादरीकरण आहे. सार्वकालिक उस्ताद, तो वारसा पुढे चालवणारी आजची पिढी आणि पुढे त्यांचे शिष्य असा हा प्रवास आहे,’ अशा शब्दांत नीता अंबानी यांनी भावना व्यक्त केल्या. पवित्र गुरूवंदनेच्या शब्दांनी नीता अंबानी यांनी आपल्या मनोगताची सांगता केली.
पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही या भव्य अशा थिएटरमध्ये रसिकांची गर्दी होती. जागतिक दर्दाचं अकाउस्टिक्स असलेल्या या थिएटरमध्ये आदराने भारलेल्या वातावरणात ‘थ्री जनरेशन्स, वन लीगसी’ (तीन पिढ्या, एक वारसा) अशा शीर्षकाचा कार्यक्रम झाला. स्वातंत्र्याचा पहिला हुंकार जिथे उमटला ‘त्या’ पवित्र ठिकाणी पोहचला सुबोध भावे, फोटो शेअर करत म्हणाला.. नीता अंबानींनी मांडलेल्या विचारांना सहमती दर्शवताना उस्ताद अमजद अली खान यांनी आई हा मुलाचा पहिला गुरू असतो या वचनाचा उल्लेख केला. कल्चरल सेंटरसारख्या व्यासपीठावर गुरुपौर्णिमेचा सार्वजनिक कार्यक्रम होत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं आणि हा उत्तम उपक्रम असल्याची भावना व्यक्त केली.
अनादि कालापासून चालत आलेल्या गुरू-शिष्य परंपरेनुसार गुरूंना वंदन करण्याचा, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा वार्षिक कार्यक्रम नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये पार पडला. भारतातलं सर्वोत्तम ते ते जगाला दाखवायचं आणि जगातलं सर्वोत्तम ते ते भारताला दाखवायचं असा नीता अंबानी यांचा दृष्टिकोन यामागे आहे. ‘परंपरा : ए गुरुपौर्णिमा स्पेशल’ या कार्यक्रमाचं हे पहिलंच वर्ष होतं. दोन दिवसांत चार हजारांहून अधिक दर्दी रसिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावरूनच या कार्यक्रमाचं यश दिसून येतं.