JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मुलीच्या घटस्फोटानंतर बॉलिवूड अभिनेत्री म्हणते, ‘लग्न करण्यापेक्षा लिव्ह-इनमध्ये राहा’

मुलीच्या घटस्फोटानंतर बॉलिवूड अभिनेत्री म्हणते, ‘लग्न करण्यापेक्षा लिव्ह-इनमध्ये राहा’

‘लग्न करण्यापेक्षा लिव्ह-इनमध्ये राहा’ असं म्हणणाऱ्या या अभिनेत्रीनं स्वतःच्या मुलीला मात्र असं न करण्याविषयी सुचवलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 मार्च : बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत ज्या त्यांच्या बोल्ड विधानांमुळे सतत चर्चेत असतात. अनेकदा यामुळे त्या वादाची शिकारही ठरतात. यामध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं कारण नीना या ज्या प्रमाणे बोल्ड आणि बिनधास्त विधानं करतात त्याप्रमाणे त्या त्यांच्या रिअल लाइफमध्येही बोल्ड आहेत. काही दिवसांपूर्वी विवाहित माणसाच्या प्रेमात पडू नका असा सल्ला देणाऱ्या नीना गुप्ता पुन्हा एकदा त्यांच्या अजब सल्ल्यामुळे चर्चेत आल्या आहेत. नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिनं काही दिवसांपूर्वीच पती मधू मंटेनापासून घटस्फोट घेतला. मागच्या वर्षी मसाबानं तिच्या सोशल मीडियावरून याची माहिती दिली होती. नीना यांना जेव्हा मुलीच्या या निर्णयाबद्दल समजलं तेव्हा हे त्यांच्यासाठीही खूप धक्कादायक होतं. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या मुलीच्या घटस्फोटावर भाष्य करताना नीना यांनी सर्वांना एक अजब सल्ला दिला आहे. मसाबाच्या घटस्फोटाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘लग्न करण्यापेक्षा लिव्ह इनमध्येच राहा.’ Viral Video : Bigg Boss विनरवर जीवघेणा हल्ला, मारहाण करत डोक्यात फोडली बाटली

नीना म्हणाल्या, ‘मी सुरुवातीला माझ्या मुलीला लिव्ह इन रिलेशपमध्ये राहू नको असा सल्ला दिला होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मला वाटतं तेच योग्य आहे. माझ्या विचारात हा बदल माझ्या मुलीच्या घटस्फोटामुळेच नाही तर सध्या ज्याप्रमाणे कपल वेगळे होतात किंवा वादग्रस्त आयुष्य जगतात हे पाहून आला आहे. एवढा पैसा खर्च करुन लग्न करा, एवढी मेहनत करा, नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करा आणि मग शेवटी काय तर घटस्फोट घ्या. त्यापेक्षा लिव्ह इनमध्ये राहणंच चांगलं आहे. मागच्या 3-4 वर्षात माझ्या विचारात खूप बदल झाला आहे.’ Birthday Special : बॉलिवूड पदार्पणाआधीच लव्ह लाइफमुळे चर्चेत राहिली होती जान्हवी

काही दिवसांपूर्वीच नीना गुप्ता यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामुळे त्या खूप चर्चेत आल्या होत्या. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी धक्कादायक खुलासा करत विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू नका असा सल्ला दिला होता. नीना यांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या शुभ मंगल ज्यादा सावधान या सिनेमात दिसल्या होत्या. याशिवाय त्या लवकरच रणवीर सिंहच्या 83 या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात त्या रणवीरच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहेत. कडाक्याच्या थंडीत असं झालं होतं ‘राजा हिंदुस्तानी’च्या KISSING सीनचं शूट!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या