amol kolhe amit thackeray
मुंबई, 27 एप्रिल- अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांच्या कामाबद्दलच्या अपडेट अमोल कोल्हे शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांची भेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्यासोबत झाली. याच भेटीबद्दल अमोल कोल्हे यांनी एक वक्तव्य केलं आहे. सध्या त्यांचे वक्तव्य तर चर्चेत आहेच शिवाय या भेटीचा फोटो देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमित ठाकरे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत अमोल कोल्हेंनी पोस्ट लिहिली आहे. “जमिनीवर पाय असलेल्या अमित ठाकरेंना भेटून आनंद झाला,” असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलं आहे. अमोल कोल्हेंची ही पोस्ट सध्या चर्चेत असून त्यावर अनेकांनी कमेंटही आल्या आहेत. वाचा- OMG!उर्फीला रेस्टॉरंटच्या दारातच थांबवलं, अभिनेत्रीचा बाहेरच धिंगाणा,काय घडलं? अमोल कोल्हेंनी नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलाखत घेतली.राज ठाकरेंनी या कार्यक्रमात कुटुंबियांसह हजेरी लावली होती. राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे व मुलगा अमित ठाकरे यांच्यासह उपस्थित होते. यावेळीचाच अमित ठाकरे व अमोल कोल्हे यांचा फोटो आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.
अभिनयात ठसा उमटवल्यानंतर अमोल कोल्हे राजकारणात सक्रिय झाले. आता ते राष्ट्रवादीचे काँग्रेसचे खासदार आहेत.स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे गेल्या काही काळात ग्रामीण भागात अमोल कोल्हे यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्यामुळे नागरिक त्यांच्याकडे कायम आदराने पाहतात.
अमोल कोल्हे यांनी मोदी लाटेतही लोकसभेची निवडणूक जिंकली. 2019 मध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 4 खासदार निवडून आले. यामध्ये अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. आता देखील ते जेव्हा एखाद्या मुद्द्यावर बोलतात तेव्हा ग्रामीण भागात त्याची बऱ्यापैकी चर्चा रंगते. मागील वर्षी त्यांनी सोशल मीडियावरून काही काळासाठी ब्रेक घेतला होता.तेव्हा देखील त्यांची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा ते सोशल मीडियावर जोमाने सक्रीय झाले आहे. कलाकार म्हणून ते लोकांच्यात लोकप्रिय आहेतच पण आता त्यांची राजकारणात देखील लोकप्रियता वाढत आहे. अगदी सहजपणे ते लोकांच्या मिक्स होतात व त्यांचे प्रश्न समजावून घेताना दिसतात.