JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मला याची रोज जाणीव करुन दिली जाते...' घटस्फोटाच्या नोटीसवर नवाझुद्दीनच्या पत्नीनं सोडलं मौन

'मला याची रोज जाणीव करुन दिली जाते...' घटस्फोटाच्या नोटीसवर नवाझुद्दीनच्या पत्नीनं सोडलं मौन

घटस्फोटाची नोटीस का पाठवली याबाबत नवाझुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियानं अखेर मौन सोडलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मे : बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी सध्या सओशल मीडियावर खूप चर्चेत आहे. नवाझची पत्नी आलियानं त्याला घटस्फोटाची कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर नवाझच्या नावाची खूप चर्चा होत आहे. आलियाचे वकील अभय सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनमध्ये स्पीड पोस्टची सुविधा नसल्यानं त्यांनी नवाझला इ-मेल आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यामातून ही नोटीस पाठवली आहे. मात्र यावर नवाझुद्दीन सिद्दीकीनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र अशाप्रकारे नोटीस का पाठवली यावर नवाझची पत्नी आलियानं मात्र प्रतिक्रिया दिली आहे. नावझुडद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या गावी म्हणजे मुजफ्फरनगरला 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन आहे. बॉम्बे टाइम्स दिलेल्या मुलाखतीत त्याची पत्नी आलिया म्हणाली, ‘दोन महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये मला आत्मपरिक्षण करण्याची संधी आणि बराच वेळ सुद्धा मिळाला. लग्नाच्या नात्यात आत्मसन्मान ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जो आज माझ्याकडे नाही. माझ्याकडे स्वाभिमान उरलेला नाही.’ KISS का किस्सा! कंगना रणौतनं सांगितला तिच्या पहिल्या चुंबनाचा अनुभव

आलिया म्हणाली, ‘मला रोज या गोष्टीची जाणीव करुन दिली जायची की, मी काहीच नाही आहे. माझं काहीच महत्त्व नाही. मला नेहमीच एकटेपणा जाणवायचा. त्याचा भाऊ शमास हा सुद्धा एक मुद्दा आहे. मी माझ नाव अंजली किशोर पांडे पुन्हा एकदा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मला माझ्या फायद्यासाठी कोणाच्या नावाचा वापर करायचा नाही.’

संबंधित बातम्या

आलिया पुढे म्हणाली, मला या प्रवाहासोबत काहीतरी करुन दाखवायचं आहे. मी माझ्या भविष्याबाबत जास्त विचार केलेला नाही. पण मला आता हे नातं पुढे न्यायचं नाही. तडजोड करण्याची काहीच शक्यता नाही आहे. मी माझ्या मुलांना सांभाळलं आहे आणि मला त्यांची कस्टडी हवी आहे. नवाझ आणि आलियाचं लग्न 2009 मध्ये झालं होतं. या दोघांना 2 मुलं आहेत. याआधी नवाझचं लग्न शीबासोबत झालं होतं मात्र त्याचं हे लग्नही फार काळ टिकलं नव्हतं. ऋषी कपूर यांच्या आठवणीत पुन्हा भावुक झाल्या नीतू, Photo शेअर करुन म्हणाल्या… आर्थिक तंगीमुळे अभिनेत्यावर आली फळं विकायची वेळ, आयुष्मानसोबत केलं आहे काम

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या