JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / नवाझुद्दीन सिद्दीकीला घटस्फोटाची नोटीस; पत्नी आलियाने लावले गंभीर आरोप

नवाझुद्दीन सिद्दीकीला घटस्फोटाची नोटीस; पत्नी आलियाने लावले गंभीर आरोप

लॉकडाऊनमुळे ही नोटीस व्हॉट्सअॅप आणि ईमेल वर पाठवण्यात आली आहे. मात्र अद्यापही नवाझुद्दीननं या नोटिशीला उत्तर दिलेलं नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिखा धारिवाल/ मुंबई, 18 मे : अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीला (nawazuddin siddiqui) त्याची पत्नी आलियाने (alia) लॉकडाऊनमध्ये घटस्फोटाची नोटीस  (divorce notice) पाठवली आहे. यामध्ये आलियाने पतीवर गंभीर आरोप लावलेत. लॉकडाऊनमुळे ही नोटीस व्हॉट्सअॅप आणि ईमेल वर पाठवण्यात आली आहे. मात्र अद्यापही नवाझुद्दीननं या नोटिशीला उत्तर दिलेलं नाही. आलियाचे वकील अभय सहाय यांनी सांगितल्यानुसार, आता पोस्ट ऑफिस बंद आहे आणि स्पीड पोस्टमार्फत नोटीस पाठवण्याची सुविधा नाही. त्यामुळे whatsapp आणि ई-मेलवर नोटीस पाठवण्यात आली आहे. घटस्फोट आणि मेन्टनेंससाठी ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आलियाच्या वकिलांनी दिली आहे. आलिया यांनी नवाजुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप लावलेत. आता त्यांच्याकडून नोटिशीच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहोत. वकील अभय यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितलं की, आलिया आणि नवाज यांच्या नात्यात कित्येक कालावधीपासून समस्या सुरू होत्या. ते दोघंही वेगळे राहत आहेत आणि याच कारणामुळे आलियानं घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. हे वाचा -  अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी कुटुंबासह 14 दिवसांसाठी क्वारंटाईन, कोरोना टेस्ट… आलियाशी फोनवरून संवाद साधण्यात आला. ती म्हणाली, “आमचं नातं कधीच चांगलं नव्हतं, नात्यात नेहमी तणाव होता. मी एक पत्नी म्हणून खूप साऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं कारण तो सेलिब्रिटी आहे आणि मी जर याबाबत बोलले असते, तर आणखी वाद झाले असते. आमचं नातं वाचवण्यासाठी मी खूप प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून नातं टिकवण्याबाबत तशी सकारात्मक प्रतिक्रिया कधीच मिळाली नाही. त्यांचा पॉझिटिव्ह अॅटिट्युड मला कधीच वाटला नाही” “त्यांना ना माझी काही पडली आहे, ना मुलांची. आम्ही खूप दिवसांपासून वेगळे राहत आहे आणि मुलं माझ्यासोबत आहेत. लॉकडाऊनमध्ये त्यांनी माझी आणि मुलांची साधी विचारपूसही केली नाही. लॉकडाऊनमध्ये मी याबाबत खूप विचार केला. मला वाटलं फक्त समाजाला दाखवण्यासाठी नातं टिकवण्याऐवजी आम्ही वेगळं होणंच बरं आहे. त्यामुळे मी घटस्फोटाचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्याकडून अद्याप काही उत्तर आलेलं नाही. मुलांची कस्टडी मलाच मिळावी यासाठी माझे प्रयत्न राहतील”, असं आलियानं सांगितलं. हे वाचा -  अरबाजशी घटस्फोटानंतर इथे शिफ्ट झाली मलायका, पाहा तिच्या अलीशान घराचे PHOTOS नवाझुद्दीन सिद्दीकीबद्दल काही मीडिया रिपोर्टनी असा दावा केला आहे की तो लॉकडाऊनच्या काळात मुंबईतून रवाना होत त्याच्या घरी मुजफ्फरनगरला पोहोचला आहे. आईची तब्येत खराब असल्याने त्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. सध्या त्यासह त्याच्या कुटुंबाला 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या