राष्ट्रीय पुरस्काराच्या चोरीबाबत नागराज मंजुळे यांनी इतक्या वर्षांनी दिली प्रतिक्रिया
मुंबई, 8 एप्रिल- नागराज मंजुळे आणि हिट सिनेमा हे समीकरणचं बनलं आहे. समाजातील विविध गंभीर प्रश्न आपल्या अनोख्या अंदाजात पडद्यावर मांडण्याचं कौशल्य आणि दृष्टी नागराज मंजुळे यांच्याकडे आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आपल्या कलाकृतींसाठी नागराज मंजुळेंना राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. पण फारच कमी लोकांना माहिती असेल नागराज यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार चक्क चोरीला गेला होता. काय आहे हा नेमका प्रकार आम्ही तुम्हाला सांगतो. ‘सैराट, फँड्री, झुंड’ असे एकापेक्षा एक दमदार सिनेमे नागराज मंजुळेंनी आपल्या इंडस्ट्रीला दिले आहेत. सैराट या सिनेमाने तर मराठी सिनेमाला सातासमुद्रापार नेलं आहे. या सिनेमाने अख्ख्या जगाला भुरळ पाडली होती. शिवाय बॉक्स ऑफिसवरसुद्धा शंभर कोटी क्लबमध्ये प्रवेश करत रेकॉर्ड स्थापित केला होता. परंतु याआधी नागराज मंजुळे आपल्या एका शॉर्ट फिल्ममुळे चर्चेत आले होते. या शॉर्ट फिल्मचं नाव होतं ‘पिस्तुल्या’. नागराज मंजुळेंना या शॉर्ट फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. (हे वाचा: ‘जड पावलांनी निरोप घेताना..’, Maharashtrachi Hasyajatra फेम नम्रता संभेरावची ‘ती’ पोस्ट नेमकी कशाबाबत? ) पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा राष्ट्रीय पुरस्कार नागराज यांच्या घरातून चोरी झाला होता. नागराज मंजुळे ‘फॅन्ड्री’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. सिनेमाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे त्यांची आई आणि भाऊसुद्धा सेटवर आले होते. आणि अशातच घरात कोणीही नव्हतं. हीच संधी साधत चोराने नागराज यांच्या घरी डल्ला मारला होता. पण चकित करणारी गोष्ट म्हणजे नागराज मंजुळेंना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कारच या चोराने पळवला होता. नुकतंच एका मुलाखतीत याबाबत बोलताना नागराज मंजुळेंनी म्हटलं आहे, ‘मी त्या चोराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. कारण मी त्याला शोधत बसलो असतो, तर माझं पुढचं काम मला लक्ष देऊन करता आलं नसतं.त्याचा परिणाम माझ्या आगामी प्रकल्पांवर झाला असता. आणि तसंही मला मिळालेली ट्रॉफी फक्त चोरी झाली आहे, पण तो पुरस्कार तर नोंद आहे. त्यामुळे मला गोष्टींचा फारसा पडत. आणि म्हणूनच मी काम करत राहिलो. आणि त्याचंच फळ म्हणजे नागराज यांना पुन्हा पुढच्या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.
नागराज मंजुळे यांच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं झालं तर, नुकतंच नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिर्यानी’ हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात नागराज मंजुळे स्वतः ऍक्शन करताना दिसून आले आहेत. तसेच यामध्ये सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे.