JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Myra Vaikul B'day: चिमुकल्या मायराला मध्यरात्री मिळालं मोठं सरप्राईज; थाटात साजरा झाला सहावा वाढदिवस

Myra Vaikul B'day: चिमुकल्या मायराला मध्यरात्री मिळालं मोठं सरप्राईज; थाटात साजरा झाला सहावा वाढदिवस

आज मायरा आपला 6 वा वाढदिवस साजरा करत आहे. मायराच्या कुटुंबाने तिला मध्यरात्री सरप्राईज देत धूमधडाक्यात तिचा वाढदिवस साजरा केला.

जाहिरात

मायरा वैकुळ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जानेवारी-   ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून परी घराघरात पोहोचली आहे. ही भूमिका बालकलाकार मायरा वैकुळ ने साकारली आहे. मायराला या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे,. चिमुकल्या मायराचा सोशल मीडियावर मोठा दबदबा आहे. या चिमुकलीच्या प्रभावी अभिनयाने भलेभले थक्क होतात. आज मायरा आपला 6 वा वाढदिवस साजरा करत आहे. मायराच्या कुटुंबाने तिला मध्यरात्री सरप्राईज देत धूमधडाक्यात तिचा वाढदिवस साजरा केला. मायराच्या बर्थडे सेलिब्रेशनचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मायरा वैकुळने झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत नेहा अर्थातच प्रार्थना बेहेरेच्या लेकीची भूमिका साकारली होती. ही मालिका आज प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. मालिकेत मायराने साकारलेली परी प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. मायराच्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. या वयात मायराचं हे अभिनय कौशल्य सर्वांनाच थक्क करतं. **(हे वाचा:** Vanita Kharat: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचं रोमँटिक प्री-वेडिंग फोटोशूट; शेअर केला लिपलॉकचा PHOTO ) मायरा वैकुळ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अर्थातच मायराचं सोशल मीडिया अकाउंट तिची आई श्वेता वैकुळ या हॅन्डल करतात. श्वेता सतत मायराच्या नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. चिमुकली मायरा सतत विविध लूकमध्ये फोटोशूट करत असते. शिवाय मायराचे अनेक डान्स व्हिडीओ आणि मजेशीर रील्स व्हायरल होत असतात. मायरा या वयातच सोशल मीडियावर स्टार बनली आहे.

संबंधित बातम्या

मायरा आज आपला सहावा वाढदिवस साजरा करत आहे. मायराच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आईबाबानीं तिला खास सरप्राईज दिलं आहे. मध्यरात्री चिमुकलीला शुभेच्छा देत तिच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. मायराच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मायराचे हे व्हिडीओ शेर करण्यात आले आहे. यामध्ये मायराने सोनेरी रंगाचा सुंदर असा फ्रॉक परिधान केला आहे.

मायरा वैकुळ युट्युबवरसुद्धा विविध व्हिडीओ शेअर करत असते. मायराच्या फोटो आणि व्हिडीओना चाहते प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स करत असतात. मायराला सोशल मीडियावर सर्वजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनेसुद्धा आपल्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या