JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मोठा नको होऊ...'; मृण्मयी देशपांडेने सिद्धार्थ चांदेकरच्या बर्थडेला शेअर केला भन्नाट PHOTO

'मोठा नको होऊ...'; मृण्मयी देशपांडेने सिद्धार्थ चांदेकरच्या बर्थडेला शेअर केला भन्नाट PHOTO

आज मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Sidharth Chandekar Birthday) आपला वाढदिवस साजरा करत आहे. खरं तर तो सध्या आपली पत्नी आणि अभिनेत्री मिताली मयेकरसोबत लंडनमध्ये आहे. याठिकाणी तो आपला खास दिवस साजरा करत आहे. दरम्यान त्याचे कलाकार मित्र सोशल मीडियावरुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जून-   आज मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर  (Sidharth Chandekar Birthday)  आपला वाढदिवस साजरा करत आहे. खरं तर तो सध्या आपली पत्नी आणि अभिनेत्री मिताली मयेकरसोबत लंडनमध्ये आहे. याठिकाणी तो आपला खास दिवस साजरा करत आहे. दरम्यान त्याचे कलाकार मित्र सोशल मीडियावरुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने  (Mrunamayee Deshpande)  आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला आणि सिद्धार्थचा एक अतिशय जुना फोटो शेअर करत अभिनेत्याला गोड शुभेच्छा दिल्या आहेत. मृण्मयी देशपांडे एक अतिशय सक्रिय अभिनेत्री आहे. ती सतत सोशल मीडियावर विविध अपडेट्स शेअर करत असते. शिवाय त्या-त्या खास दिवशी काही हटके पोस्टसुद्धा शेअर करत असते.आजही असंच काहीसं झालं आहे. अभिनेत्रीने आज आपला खास मित्र सिद्धार्थ चांदेकरच्या वाढदिवसाचं निमित्त साधत एक अतिशय जुना अर्थातच थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून या दोन्ही कलाकारांना पहिल्या नजरेत ओळखणं कठीण झालं आहे.

संबंधित बातम्या

मृण्मयी देशपांडे पोस्ट- मृण्मयी देशपांडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर करत लिहिलंय, ‘‘आपण असे दिसत असल्या पासून ते आज पर्यंत… आपण आहोत.. आणि कायम असणारोत … माझ्या लाडक्या मित्रा.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… असाच वेडा रहा.. मोठा नको होऊस… आणि माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे’’. या पोस्टवर चाहते आणि कलाकार भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. **(हे वाचा:** ‘पुण्याच्या मुलासाठी मुंबईच्या मुलीला भेटणं…’ सिद्धार्थच्या बर्थडेला मिताली मयेकरची अनोखी पोस्ट ) ‘अग्निहोत्र’ ही मृणमयीची पहिली मालिका होती. या मालिकेमध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसुद्धा होता. मृण्मयी आणि सिद्धार्थ कॉलेज पासूनचे मित्र आहेत. आणि ते दोघेही एकमेकांशी भयानक भांडत असतात. सतत त्यांच्या भांडणाचे मजेशीर किस्से ऐकायला मिळतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या