बोल्ड आणि बिंधास्त हेमांगीच्या आईला पाहिलं का..?
मुंबई, 14 मे- आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची, कष्टाची, नि:स्वार्थी प्रेमाची आपण आपल्या उभ्या आयुष्यात कधीच परतफेड करु शकणार नाही. मात्र तरीही तिने आपल्याला दिलेल्या ह्या सुंदर आयुष्याबद्दल तिचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे मातृदिन होय. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आईसाठी खास पोस्ट करत आहेत. अशातच अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या आईसाठी खास पोस्ट केली आहे. हेमांगी कवी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. हेमांगीनं तिच्या आईसोबतचा फोटो शेअर करत एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. हेमांगीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बोल्ड आणि बिंधास्त दिसणाऱ्या हेमांगीची आई कशी आहे ..असा अनेकदा चाहत्यांना प्रश्न पडतो. यानिमित्त हेमांगीच्या आईबद्दल जाणून घेण्याची संधी हेमांगीची ही पोस्ट वाचल्यानंतर मिळते. हेमांगी कवी म्हणते की, Mummy! ❤️ वाचा- आई म्हणून माया तर प्रसंगी बाप बनून दिला आधार! असं आहे शुभांगी-सखीचं नातं जगातली सुंदर स्त्री! प्रत्येकाला असं वाटतं पण माझी आई खरंच सुंदर आहे. तिच्यासारखं 50 % सौंदर्य मला मिळालं असतं तर? पण आपण पडलो पितृमुखी! म्हटलं सौंदर्य नाही तर नाही बाकी गुण तरी घेऊयात. काही गुण अनुवंशिक आलेत काही अथक प्रयत्नांनी आणलेत. तरी ही तुझी सर नाहीच.
तुझ्यासारखा त्याग, परिवारासाठी असलेली माया, प्रेम, पप्पांना डोळे झाकून दिलेली साथ, संसारात घेतलेले कष्ट, संपाच्या काळात दाखवलेला संयम, घरात किती भांडणे झाली तरी पाहुणे, नातेवाईक घरी आले की जणू काही झालंच नाही म्हणून केलेलं त्याचं स्वागत, घरात किती ही माणसं आली तरी त्यांच्यासाठी केलेला स्वंयपाक, महीनाआखिरीला पैसे नसले तरी तुझं खंबीर असणं, प्रत्येक परिस्थितीला हसत मुखाने सामोरी जाणं, व्यवहारज्ञान, तल्लख बुद्धी (माझी आई सातवी पास आहे त्यावेळचं ते मॅट्रिक पास समजलं जायचं आणि नोकरीची offer ही आली होती), हजरजबाबीपणा, माणसांना ओळखण्याचं कसब!
प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतात पण तुझ्याबाबतीतले चढ-उतार बघता मला कायम प्रश्न पडतो आणि कुतूहल वाटतं की कसं कसं निभावून नेतेस? आताही! निव्वळ कमाल! आया great असतातच पण तु कायच्या काय great आहेस!म्हणूनच प्रत्येक जन्म तुझ्या पोटी यावा हीच ईच्छा!