मुंबई, 15 ऑक्टोबर : मिस कोहिमा 2019 (Miss Nagaland)स्पर्धेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. याचं कारण आहे या स्पर्धेची सेकंड रनरअप Vikuonuo Sachu हिनं दिलेलं उत्तर आहे. Vikuonuo Sachu ला या स्पर्धेत पीएम नरेंद्र मोदींविषयी एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिनं दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. Vikuonuo Sachu ला शेवटच्या फेरीमध्ये परिक्षकांनी, जर तुला पीएम मोदींशी बोलण्याची संधी मिळाली तर तु त्यांच्याशी काय बोलशील? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना Vikuonuo Sachu म्हणाली, ‘जर मला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली तर मी त्यांना सांगेन की त्यांनी गायींपेक्षा जास्त देशातील महिलांच्या परिस्थिती लक्ष केंद्रित करावं’ Vikuonuo Sachu चं हे उत्तर ऐकल्यावर उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अभिनेता राजकुमार रावने खरेदी केली नवी बाइक, किंमत वाचून व्हाल थक्क
5 ऑक्टोबरला मिस कोहिमा ब्यूची पिजेंट 2019 चं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये Vikuonuo Sachu पीएम मोदींच्या संबंधी विचारलेल्या प्रश्नचं उत्तर देऊन या स्पर्धेचा सेकंड रनर अप ठरली. Vikuonuo Sachu ही 18 वर्षीय कॉलेज स्टुडंट आहे. तर 23 वर्षीय Khrienuo Liezietsu नं मिस कोहिमा 2019चा किताब जिंकला. पती रणवीरच्या माघारी असं काही म्हणाली दीपिका, ज्याची तिलाच वाटू लागली भीती आवरा! भर कार्यक्रमात आलिया भटची जीभ घसरली, सर्वांसमोर दिली ‘ही’ शिवी ========================================================= मनसेसाठी निवडणुकीच्या प्रचारात उतरला अभिनेता सिद्धार्थ जाधव, पाहा VIDEO