मुंबई, 06 नोव्हेंबर: हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार एकमेकांना डेट करत असतात. त्यांच्या प्रेमाची चर्चा होते. ज्या जोड्यांची बॉलिवूडमध्ये चर्चा होते त्यापैकी एक आहे अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत (Shahid Kapoor and Mira Rajput) यांची जोडी. शाहिदची पत्नी मीरा हिच्या बेस्ट फ्रेंडला शाहिद कपूर खूप आवडत असे, तो तिचा क्रश होता. यासंबंधी मीराने प्रतिक्रिया दिली आहे. 27 वर्षांच्या मीरा राजपूतने 2015 मध्ये शाहिद कपूरशी अरेंज मॅरेज केल आहे. लग्नापूर्वी मीरा दिल्लीतल्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये शिकायची. मीराने Curly Tails मध्ये गप्पा मारताना हा किस्सा शेअर केला होता. मीरा म्हणाली,‘माझ्या बेस्ट फ्रेंडला शाहिदवर क्रश होतं. जेव्हा मी माझं लग्न शाहिद कपूरशी ठरल्याचं सांगितलं तेव्हा ती म्हणाली अरे देवा. कारण आधीही तिनी मला अनेकदा सांगितलं होतं की मला शाहिद खूप आवडतो. पण शाहिद माझ्या आयुष्यात आलाच नव्हता त्यामुळे मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण ती म्हणायची मला शाळेत असल्यापासून शाहिद आवडतो हे तुला माहीत होतं. सगळी मजामजा असायची तेव्हा.’ हे वाचा- ‘Sooryavanshi’ मध्ये कतरिना-अक्षयसोबत फेमस झाला 10 वर्षाचा मुलगा; जाणून घ्या कोण ‘मी आणि माझी मैत्रीण आता या जुन्या गोष्टी आठवून खूप हसतो. ती मैत्रीण, तिचे पती, मी आणि शाहिद नुकतंच भेटलो होतो. कोव्हिडमुळे मी शाहिद आणि मुलं सगळे पंजाबामध्ये रहायला गेलो होतो. आम्ही खरं तर काही काळासाठीच पंजाबला गेलो होतो पण लॉकडाऊन जाहीर झाल्यावर तिथेच राहिलो, असंही मीराने सांगितलं. ती म्हणाली, ‘आम्ही शहरापासून दोन आठवडे दूर अमृतसरमध्ये राहता येईल असा विचार करून आम्ही लॉकडाउनच्या आधी तिथं गेलो होतो. पण कुणाला माहीत होतं की कोरोनाचा सामना करताकरता दोन वर्षं उलटून जातील. तेव्हापासून आम्ही इथंच आहोत. माझं माहेर आणि सासर दोन्ही घरं इथंच आहेत. त्यामुळे माझी मुलं कधी या आजी-आजोबांकडे तर कधी त्या आजी-आजोबांकडे जात-येत असतात.’ हे वाचा- ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभ्याची खऱ्या आयुष्यातील लतिका पाहिली आहे का? शाहिद कपूर आणि मीराने काही दिवसांपूर्वी मुंबईत नवं घर खरेदी केलं आहे. त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे त्यावर देखरेख करायला ते दोघंही वरचेवर मुंबईत येत असतात. ऑक्टोबर महिन्यात हे दोघंही आपल्या मुलांसोबत मादीवला जाऊन सुट्टीचा आनंद लुटून आले आहेत.