मुंबई, 30 एप्रिल : पाकिस्तानी अभिनेता अली जफरवर मागच्या वर्षी अभिनेत्री मीशा शफीनं लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. मात्र पाकिस्तान कोर्टानं हे आरोप फेटाळून लावत अली जफरची निर्दोष मुक्तता केली आहे. यानंतर नॅशनल टेलिव्हिजनवर याविषयी बोलताना अली जफर आपल्या भावना रोखू शकला नाही आणि त्याला मुलाखतीदरम्यान रडू कोसळलं. वाचा : कॅन्सर फ्री झाले ऋषी कपूर? भाऊ रणधीर कपूर यांनी केला खुलासा सुत्रांच्या माहितीनुसार अली जफर स्वतः त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. यावेळी या आरोपांमुळे त्याच्या करिअरवर कसा परिणाम झाला आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबावर काय परिणाम झाला हे सांगताना अली जफर खूप भावूक झाला आणि तो मुलाखत सुरू असतानाच रडू लागला.
वाचा : ‘तुला पाहते रे’मध्ये ‘या’ अभिनेत्याच्या मुलाची एन्ट्री यावेळी बोलताना अली जफर म्हणाला, ‘मी बऱ्याच काळापासून या सर्व प्रकरणावर गप्प राहाणं पसंद केलं होतं. फक्त मीच नाही तर माझं संपूर्ण कुटुंब, माझी पत्नी,माझी मुलं या सर्वांना खूप त्रास झाला आहे. मागचं एक वर्ष मी तोंडातून एक शब्दही काढला नाही आणि ठरवलं की यासाठी कायदेशीर पावलं उचलेन. त्या लोकांनी फेक अकाउंटचा वापर करून इतर लोकांनी माझ्या विरोधात टॅग केलं. असं करून त्यांनी माझं करिअर खराब करण्याचा प्रयत्न केला गेला.’ वाचा : …म्हणून मतदानासाठी शाहरुख पाच वर्षाच्या अब्रामला मुद्दाम घेऊन गेला मीशा शफीनं केलेले लैंगिक शोषणाचे आरोप पाकिस्तानी कोर्टानं फेटाळून लावले असून या प्रकरणातून अली जफरची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर कोर्टातून बाहेर आल्यावर अलीनं मीशाला खोटं बोलल्याचे परिणाम भोगावे लागतील असं म्हटलं होतं तसेच त्यानं याविषयी ट्वीटही केलं होतं.