JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Mc Stan News: बिग बॉस जिंकताच एमसी स्टॅनचं नशीब चमकलं; शाहरुख खानच्या सिनेमातून करणार बॉलिवूड डेब्यू?

Mc Stan News: बिग बॉस जिंकताच एमसी स्टॅनचं नशीब चमकलं; शाहरुख खानच्या सिनेमातून करणार बॉलिवूड डेब्यू?

Bigg Boss 16 Winner Mc Stan Bollywood Debut With Shahrukh Khan: रॅपर एमसी स्टॅन सुरुवातीपासूनच तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र बिग बॉसच्या घरात आल्यापासून त्याच्या लोकप्रियतेत अफाट वाढ झाली आहे. एमसीने बिग बॉसची ट्रॉफी जिंकत आपली फॅन फॉलोईंग काय आहे हे दाखवून दिलं आहे.

जाहिरात

शाहरुख खान-एमसी स्टॅन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 मार्च- रॅपर एमसी स्टॅन सुरुवातीपासूनच तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र बिग बॉसच्या घरात आल्यापासून त्याच्या लोकप्रियतेत अफाट वाढ झाली आहे. एमसीने बिग बॉसची ट्रॉफी जिंकत आपली फॅन फॉलोईंग काय आहे हे दाखवून दिलं आहे. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. घरातून बाहेर येताच आता स्टॅनकडे विविध प्रोजेक्ट्सची रंग लागल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, एमसी स्टॅन शाहरुख खान च्या चित्रपटात दिसणार आहे. बिग बॉसच्या घरात असताना एमसी स्टॅनला चांगलीच पसंती मिळाली होती. दरम्यान घरातून बाहेर आल्यांनतर एमसी स्टॅनने इन्स्टा लाईव्ह केलं त्यामध्ये सर्वाधिक लोक जॉईन झाले होते. त्यामुळेच एमसी स्टॅनने सर्व सेलेब्रेटींना मागे टाकत इन्स्टा लाईव्हचा नवा रेकॉर्ड केला आहे. दरम्यान आता बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ चित्रपटात एमसी स्टॅन झळकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवानच्या मेकर्सनी एमसी स्टॅनला सिनेमासाठी अप्रोच केलं आहे. (हे वाचा: Shahrukh Khan: शाहरुख खानकडे का आहेत महिला बॉडीगार्ड्स? इतक्या वर्षानंतर उघड झालं सीक्रेट ) टाईम्स नाऊमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ‘जवान’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी एमसी स्टॅनशी याबाबत चर्चा केली आहे. ही बातमी समोर आल्यापासून स्टॅनच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. मात्र एमसी स्टॅनने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीय. परंतु हे खरं ठरल्यास एमसी स्टॅनसाठी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची ही मोठी संधी ठरेल. बिग बॉस जिंकल्यानंतर आता एमसी स्टॅन चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. एका एंटरटेनमेंट न्यूज हँडलने ट्विटरवर ही बातमी शेअर केली आहे. त्यांनी ट्विट करत लिहलंय, “एक्सक्लुझिव्ह - ‘जवान’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅनशी संपर्क साधला आहे. मात्र अद्याप या वृत्ताला चित्रपटाच्या टीमकडूनही कोणताच दुजोरा मिळालेला नाहीय. तसेच एमसी स्टॅन खरंच सिनेमामध्ये अभिनय करणार रॅपसाठी त्याची निवड करण्यात आली आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शाहरुख खानने तब्बल चार वर्षानंतर ‘पठाण’च्या माध्यमातून पडद्यावर पुनरागमन केलं आहे. अभिनेत्याने या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडीत काढत नवा रेकॉर्ड सेट केला आहे. दरम्यान आता शाहरुख ‘जवान’मधून झळकण्याची सज्ज आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत साऊथ लेडी सुपरस्टार नयनतारा आणि विजय सेतुपतीसुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या