JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'अब तू किसी लड़की को हाथ तो लगा के दिखा...', Mardaani 2 चा दमदार Teaser रिलीज

'अब तू किसी लड़की को हाथ तो लगा के दिखा...', Mardaani 2 चा दमदार Teaser रिलीज

‘मर्दानी 2’च्या या शानदार टीझरसोबतच हा सिनेमा कधी रिलीज होणार हे सुद्धा सांगण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 सप्टेंबर : बॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्री राणी मुखर्जी मागच्या बऱ्याच काळापासून तिचा आगामी सिनेमा ‘मर्दानी 2’मुळे प्रचंड चर्चेत आहे. सर्वांनाच या सिनेमाच्या रिलीज डेटची प्रतीक्षा होती मात्र आता ही प्रतीक्षा संपली असून या सिनेमाच्या टीझरसोबतच रिलीज डेट सुद्धा सांगण्यात आली आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून या सीरिजच्या पहिल्या पार्ट प्रमाणेच या पार्टमध्येही राणीचा डॅशिंग लुक पाहायला मिळत आहे. ‘मर्दानी 2’चा हा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या छोट्याश्या टीझरमध्ये राणी तिच्या टीमसोबत कोणत्यातरी भागात रेड मारताना दिसत आहे. याशिवाय या ट्रेलरमध्ये तिचा एक संवाद सुद्धा ऐकू येत आहे. टीझरमध्ये राणी म्हणते, ‘अब तू किसी लड़की को हाथ तो लगा के दिखा, तुझे इतना मारुंगी की तेरी त्वचा से तेरी उम्र का पता नहीं चलेगा’ या शानदार टीझरसोबतच हा सिनेमा 13 डिसेंबरला रिलीज होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. Bigg Boss 13 : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची Bigg Boss च्या घरात घासणार भांडी?

‘मर्दानी 2’मध्ये राणी मुखर्जी एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. जी एका चलाख आणि कुख्यात व्हिलनच्या शोधात तिच्या टीमचं प्रतिनिधित्व करणार आहे. पहिल्या पार्ट प्रमाणे या पार्टमध्येही राणी स्टंट सीन करताना दिसणार आहे. हा सिनेमा सामाजिक मुद्द्यावर आधारित असणार आहे. कंगनाच्या SEXUAL पार्टनरबद्दल समजल्यावर काय होती पालकांची प्रतिक्रिया डिसेंबरमध्ये एक-दोन नाही तर तब्बल 5 बिग बजेट सिनेमा रिलीज होणार आहेत. पानिपत-6 डिसेंबर, पति पत्नी और वो- 6 डिसेंबर, मर्दानी 2- 13 डिसेंबर, दबंग 3-20 डिसेंबर, आणि गुड न्यूज-27 डिसेंबर हे सर्व सिनेमा एकाच महिन्यात रिलीज होत आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे. 10 वर्षांच्या मुलाचं ढोलकीवर रॅप साँग, व्हिडीओ पाहून हनी सिंगही झाला हैराण =========================================================== VIDEO: भिडेंना डॉक्टरांना दाखवण्याची गरज- जितेंद्र आव्हाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या