ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन; वयाच्या 88व्या वर्षी घेतली अखेरचा श्वास
मुंबई, 24 जुलै- मराठी तसेच हिंदी नाटक सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते जयंत सावरकर यांनी वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं. मुंबईतील राहत्या खरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 100 हून अधिक मराठी अजरामर नाटकांमध्ये त्यांनी काम केलं होतं.गेल्या काही दिवासांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांच्या फिटनेसचं नेहमीच कौतुक व्हायचं. अगदी श्रीराम लागू यांनी देखील त्यांच्या या फिटनेसचं कौतुक केलं होतं. एका मुलाखतीमध्ये खुद्द जयंत सावरकर यांनी याचा खुलासा केला होता. शिवाय सर्व आजारापसून लांब राहण्यासाठी ते कुठलीही गोळी घात नव्हते तर काय करत होते याबद्दल देखील सांगितले होते. अभिनेते जयंत सावरकर यांना सर्वजण प्रेमानं आण्णा म्हणत असे. त्यांनी एक मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी त्यांच्या आरोग्याचं रहस्य सांगितलं होतं. तेव्हा ते म्हणाली होते की, मी नेहमी सकाळी चारला उठतो. मग रात्री कितीही उशीरा का झोपेना, त्यामुळेच मी नेहमी टवटवीत दिसतो. शिवाय या वयातही मला कसलचं दुखणं म्हणजे सांधेदुखी नाही. त्याला कारणही तसंच आहे. मी कुठलीही गोळी देखील खात नाही, मी आयुर्वेदिक उपाय करतो. Jayant Savarkar : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन; वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ते पुढे म्हणाले होते की, माझं वय 80 च्या वर आहे पण मी 20 ते 25 पायऱ्यांचा जीना एकावेळस चढतो, तोही न थकता. मला कसीलच गुडघेदुखी किंवा सांधेदुखी नाही कारण मी यासाठी रोज झोपताना एक भिंडी चिरून पाण्यात भिजत घालतो आणि तेच पाणी सकाळी पितो. यामुळे भिंडीचं बुळबुळी पाणी माझ्या शऱीरात जातं, त्यामुळे माझे कधीच सांधे दुखत नसल्याचे सांगत नाही. तसेच मी नियमित दुधीचा रस घेतो, सकाळी लवकर उठतो त्यामुळे मी फिट असल्याचे त्यांनी सांगितले होते. आज त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वात एक पोकळी निर्माण झाले आहे. पण त्यांची या वायतली एनर्जी अनेक जणांना जगण्याची उर्जा देत होती, हेही तितकेच खरे आहे. जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला.वयाच्या विसाव्या वर्षी 1954 पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. वयाच्या73व्या वर्षांपर्यंत त्यांच्या अभिनयाची कारकिर्द सुरूच राहिली. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे),अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष),अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), अवध्य (नाचणे), आम्ही जगतो बेफाम (चिवटे),एकच प्याला (तळीराम) सारख्या अनेक दर्जेदार मराठी नाटकात त्यांनी काम केलं. 100 हून अधिक नाटकात काम करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे आहे. “अभिनेता जयंत सावरकर मागील 15 दिवस रुग्णालयात होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर ते बरे झाले होते. काल संध्याकाळी त्यांची तब्येत खालावली. त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं. त्यांच्या मुलीचा रात्री फोन आला की, त्यांची तब्येत खालावलीये. आम्ही डॉक्टरांशी बोलून सकाळी 10 वाजता निर्णय घेणार आहोत. पण त्यानंतर त्यांचे हार्टबीट्स पुन्हा सुरू झाल्याने डॉक्टरांनी उपचार सुरू केले. पण त्यानंतर काही वेळातच त्यांचं निधन झालं”, अशी माहिती अभिनेते जयवंत वाडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.