JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'प्रेम आहे माझं, माझ्या …' प्राजक्ता माळीची नवीन पोस्ट चर्चेत

'प्रेम आहे माझं, माझ्या …' प्राजक्ता माळीची नवीन पोस्ट चर्चेत

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. प्राजक्तानं नुकतीच एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 फेब्रुवारी- अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असते. तिचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे. प्राजक्ताला नेहमीच तिचे चाहते सपोर्ट करताना दिसतात. प्राजक्तानं नुकतीच एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांची जयंती. त्यानिमित्ताने हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने अनेक कलाकार हे सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा देताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने एक पोस्ट शेअर केली आहे. सोबतच तिचे मराठमोळ्या लुकमधील काही फोटो शेअर केले आहेत. वाचा- हृता दुर्गुळे ठरली पॉप्युलर फेस ऑफ दि इअर, चाहत्यांकडून होतयं कौतुक प्राजक्ता माळीनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं..प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं…प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं..मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं…कवीश्रेष्ठ कुसूमाग्रजांनी लिहीलेल्या ह्या ओळींसारखंच प्रेम आहे माझं, माझ्या “मराठीवर”…♥️♥️♥️जे आहे आज, राहील उद्या , परवा..मरणोत्तरही….. 🌟 “मराठी भाषा गौरव दिनाच्या”; महाराष्ट्राला आभाळभर शुभेच्छा…♥️(फोटोंमधले अलंकार अर्थातच मराठी पारंपरिक अलंकारांसाठी वाहिलेल्या उपक्रमातील आहेत… “प्राजक्तराज” 🎯)prajaktaraj.in. — Website. #मीमराठी #माझीमराठी #मातृभाषा #मराठीमूलगी #सह्याद्रीचीलेक #prajakttamali @♥️ प्राजक्ता माळीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नऊवारीतील पारंपारिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिनं गळ्यात पारंपारिक दागिने आणि नाकात नथ घातली आहे. फोटोंमधले अलंकार अर्थातच मराठी पारंपरिक अलंकारांसाठी वाहिलेल्या उपक्रमातील “प्राजक्तराज” चे असल्याचे देखील तिनं सांगितलं आहे.

संबंधित बातम्या

प्राजक्ता माळीनं नुकताच तिचा दागिन्याचा व्यवसाय सुरू केला आहे. शिवाय तिची दोन पुस्तक देखील बाजारपेठेत आली आहेत. अभिनयाशिवाय प्राजक्ता आता व्यवसायात देखील उतरली आहे.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मध्यंतरी ती राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. प्राजक्तानं त्यावेळी देखील आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले होते. प्राजक्ता माळी श्री श्री रवीशंकर यांना आपले गुरू मानते. यंदाच्या महाशिवरात्रीनिमित्तं ती बिझी शेड्यूलमधून वेळ काढून श्री श्र रवीशंकर यांच्या बंगळूर येथील आश्रमात गेली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या