JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सई ताम्हणकरला IMDBच्या top 10 stars मध्ये मिळालं मानाचं स्थान

सई ताम्हणकरला IMDBच्या top 10 stars मध्ये मिळालं मानाचं स्थान

मराठी सिनेसृष्टीतील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar) नेहमीच चर्चेत असते. आता सईच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 डिसेंबर- मराठी सिनेसृष्टीतील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar) नेहमीच चर्चेत असते. तिच्या काही बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली असते. आता सईच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सईला IMDB च्या Best of 2021 च्या यादीत मानाचं स्थान मिळालं आहे. Internet Movie Database (IMDB) ने नुकतीच Top 10 Breakout stars of Indian films and web series 2021 ची लिस्ट जाहीर केली. या यादीमध्ये IMDB ने सईचा उल्लेख केला. सईने यंदा समांतर, नवरसा आणि मीमी ह्या तीन वेगवेगळ्या भाषांच्या कलकृतींमधून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांव्दारे रसिकांच्या मनावर आपली छाप सोडली आगे. IMDB ने ह्याची दखल घेत सईला ‘breakout star’ म्हटले आहे.

संबंधित बातम्या

अभिनेत्री सई ताम्हणकर ह्या सन्मानाविषयी म्हणते, आयएमडीबी हा ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे. कलाकृतीला भाषेचं बंधन न लावता, त्याकडे पाहण्याचा विस्तीर्ण दृष्टिकोण ग्लोबल सिनेमाचा आणि वेबसीरिजचा असतो. अशा ठिकाणी माझ्या कामाचा गौरव होणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आयएमडीबी सारख्या प्रतिथयश प्लॅटफॉर्मने आपल्या कामाचा असा गौरव करावा ही आनंदाचीच गोष्ट आहे. वाचा :#BanLipstick अभिनेत्रींचा प्रमोशन फंडा की आणि काय…,लिपस्टिक पुसण्याचे कारण काय? सई मुळची सांगलीची आहे.सई चिंतामण महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिची शैक्षणिक कारकीर्द फार उत्तम होती. सईला मराठी चित्रसृष्टीतील पहिली बिकिनी गर्ल म्हणून देखील ओळखलं जातं. सई ताम्हणकरचे नाव मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत घेतले जाते. सईने छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हळूहळु तिने स्वबळावर मोठ्या पडद्यावर जम बसवला. मराठीसोबतच सईने हिंदीत देखील ‘हंटर’, ‘लव्ह-सोनियो’ सारख्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. वाचा :Good Vibes 2021 : यंदा या चार मराठी मालिका Googleवर केल्या गेल्या सर्वात जास्त सर्च ! यासोबतच सईने आमिर खानच्या ‘गजनी’ आणि सुभाष घई यांच्या ‘ब्लॅक ऍड व्हाईट’ सह अनेक हिंदी चित्रपटात भूमिका बजावल्या आहेत. तिच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या पैलूंमुळे तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.सई ताम्हणकर आणि अमेय गोसावी यांचे लग्न 15 डिसेंबर 2013 ला झाले होते.तीन वर्षांच्या नात्यानंतर सईने अमेयसोबत लग्न केले होते परंतू त्यांचा घटस्फोट झालेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या