JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रिंकू राजगुरूची बारावीची मार्कशीट व्हायरल; बघा तुमच्या आर्चीला इंग्रजीत किती मार्क पडलेले

रिंकू राजगुरूची बारावीची मार्कशीट व्हायरल; बघा तुमच्या आर्चीला इंग्रजीत किती मार्क पडलेले

“तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का, की इंग्लिशमध्ये सांगू?” हा डायलॉग तर प्रेक्षकांनी चांगलाच उचलून घेतला. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या आर्चीचा हा डायलॉग आहे, ज्यामुळं ती लोकप्रिय झाली त्या अभिनेत्रीला बारावीत किती टक्के मार्क मिळाले.

जाहिरात

रिंकू राजगुरूची बारावीची मार्कशीट व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 जून:  सैराट सिनेमातील डायलॉग आजही पोरांच्या तोंडपाट आहेत. या सिनेमानं मराठी मनोरंजन विश्वाला रिंकू राजगुरू साऱखी गुणी, अभिनयसंपन्न अशी अभिनेत्री दिली. सैराट सिनेमात रिंकून आर्चीची भूमिका साकारली होती, हे कोणाला नव्यानं सांगायची गरज नाही. रिंकूला आजही सर्वजण आर्ची नावानचं ओळखतात. तिचा प्रत्येक सिनेमातील डायलॉग प्रेक्षकांना डोक्यावर घेतला. विशेष करून तिचा “तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का, की इंग्लिशमध्ये सांगू?” हा डायलॉग तर प्रेक्षकांनी चांगलाच उचलून घेतला. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या आर्चीचा हा डायलॉग आहे, ज्यामुळं ती लोकप्रिय झाली त्या अभिनेत्रीला बारावीत किती टक्के मार्क मिळाले. एवढेच नाही तर इंग्रजीत सांगून म्हणणाऱ्या या अभिनेत्रीला इंग्राजीत नेमके किती मार्क मिळाले.आज रिंकू राजगुरूचा वाढदिवस आहे. चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज आपण तिच्या दहावी बारावीच्या मार्काबद्दल जाणून घेणार आहे. रिंकूने दहावीला सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील शाळेतून परीक्षा देत 66.40 टक्के गुण मिळवले होते. मात्र बारावीला अधिक अभ्यास करून तिनं यापेक्षा जास्त 82 टक्के गुण मिळवले आहेत. सोलापूर जवळील टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा दिली होती. यावेली तिला बघण्यासाठी परीक्षा केंद्रावर गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे इंग्लिशमध्ये सांगू.. म्हणणाऱ्या आर्चीला म्हणजे रिंकू राजगुरूला बारावीत इंग्रजीत 100 पैकी 54 गुण मिळाले आहेत.

रिंकूला दहावीत 66.40 टक्के मार्क मिळाले होते. त्यावेळी रिंकूच्या सैराट सिनेमाचे शूटिंग सुरू असल्याने तिला शाळेत जाता आले नव्हते. त्यामुळे दहावीच्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याचे रिंकूने त्यावेळी सांगितले होते. मात्र ही कसर रिंकूने बारावीच्या परीक्षेत भरून काढल्याचे दिसले. बारावीनंतर रिंकूचे शिक्षण सुरू आहे.

रिंकू सध्या तिच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसत आहे. तिचे फिटनेस व्हिडिओ ती शेअर करताना दिसते. सैराट सिनेमानंतर रिंकू मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेली रिंकू चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी नेहमीच तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या