मुंबई, 26 एप्रिल- मराठी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सर्वात ऍक्टिव्ह अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सतत काही ना काही हटके करत असते. त्यामुळे ती सतत चर्चेत असते. चित्रपटांप्रमाणेच ती सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळेच तिच्या प्रत्येक पोस्टची जोरदार चर्चा होत असते. ट्रॅडिशनल असो किंवा वेस्टर्न दोन्ही लुकमध्ये अभिनेत्री चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. काहीसं झालं आहे. प्रिया बापटने आपला बोल्ड आई ब्युटीफुल व्हिडीओ (Instagram Video) शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये प्रिया एकदम बोल्ड आणि बिनधास्त लुकमध्ये दिसून येत आहे. खरं तर हा एक इन्स्टाग्राम रील आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राउन्डला इंग्लिश गाणं वाजत आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया बापटने व्हाईट कलरचा डीप नेक शर्ट परिधान केला आहे. सोबतच केस मोकळे सोडत डार्क रेड लिपस्टिकने आपला लुक कम्प्लिट केला आहे. अभिनेत्री व्हिडीओमध्ये विविध पोज देताना दिसून येत आहे. अभिनेत्रीने काही मिनिटांपूर्वी हा व्हिडीओ शेअर केला आहे. काही मिनिटांतच या व्हिडिओला साडे सहा हजारांच्यावर लाईक्स मिळाले आहेत. शिवाय चाहत्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत म्हटलं आहे, ‘हॉट अँड क्लासी’, तर दुसऱ्याने म्हटलं आहे, ‘एकदम झकास लुक’ तर आणखी एकाने म्हटलं आहे, ‘क्रश.. क्रश…क्रश’, तर चौथ्या एकाने म्हटलं आहे, ‘जाणाऱ्या प्रत्येक वर्षासोबत तू आणखीनच सुंदर होत आहेस’. अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स चाहत्यांनी केलेल्या वाचायला मिळत आहेत.
प्रिया बापट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. या फोटो आणि व्हिडिओंची प्रचंड चर्चासुद्धा होते. अभिनेत्रीने गेल्या काही दिवसांमध्ये आपले अनेक बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो शेअर केले होते. आपल्या बॅकलेस फोटोंमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. चाहत्यांना हे फोटो प्रचंड पसंत पडले होते. प्रिया बापट नुकतंच एका हिंदी वेबसीरीजमध्ये झळकली होती. सोबतच ती आपल्या ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटकामध्ये व्यग्र आहे. या नाटकाची ती निर्माती आहे.