JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रार्थना बेहरेला गर्ल गॅंगसोबत धमाल करताना पाहून सोनाली कुलकर्णी म्हणाली असं काही...

प्रार्थना बेहरेला गर्ल गॅंगसोबत धमाल करताना पाहून सोनाली कुलकर्णी म्हणाली असं काही...

प्रार्थना सध्या तिच्या गर्ल गॅंगसोबत सुट्टयांचा आनंद घेत आहे. सोशल मीडिया पोस्ट करत तिनं याबद्दल माहिती दिली आहे. पण तिच्या या ट्रीपचे फोटो पाहून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं मात्र एक कमेंट केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 मार्च- अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या तिचा स्वतःचा वेळ एण्जॉय करताना दिसत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये ती शेवटची दिसली. या मालिकेमधील तिच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. प्रार्थना सध्या तिच्या गर्ल गॅंगसोबत सुट्टयांचा आनंद घेत आहे. सोशल मीडिया पोस्ट करत तिनं याबद्दल माहिती दिली आहे. पण तिच्या या ट्रीपचे फोटो पाहून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं मात्र एक कमेंट केली आहे. सध्या सोनालीच्या या कमेंटनं सर्वांचे लक्षवेधलं आहे. प्रार्थना बेहरेने नुकतेच तिच्या इन्स्टावर तिच्या गर्ल ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. या ट्रीपमध्ये ती तिच्या गर्ल गॅंगसोबत फूलटू मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. तिचे ट्रीपचे फोटो पाहून चाहते देखील कमेंट करत आहेत. शिवाय यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं देखील कमेंट केली आहे. सोनालीनं म्हटलं आहे की, ‘तुझे याद न मेरी आये..’. म्हणजेच तुला माझी आठवण आली नाही का..असा प्रश्नचं सोनालीनं तिच्या लाडक्या आणि जवळच्या मैत्रिणीला केला आहे. वाचा- अशोक सराफ यांच्यासोबत ज्यामुळं जमली जोडी, ती आठवण निवेदिता यांनी केली शेअर सोनालीच्या लग्नाला प्रार्थनानं लावली होती हजेरी प्रार्थना बेहरे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या दोघींची मैत्री जगजाहीर आहे. प्रार्थनाने सोनालीच्या लग्नाला देखील परदेशात हजेरी लावली होती. शिवाय अनेकदा सोनाली प्रार्थनाची माझी तुझी रेशीमगाठच्या सेटवर देखील जाऊन भेट घ्यायची. या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. सोनालीच्या लग्नाच्या सर्व कार्यक्रमात प्रार्थनानं नवऱ्यासोबत हजेरी लावली होती.

संबंधित बातम्या

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असलेल्या कलाकारांपैकी एक आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील सेटवरील धमालमस्तीचे अनेक व्हिडिओही ती नेहमी शेअर करत होती. चाहत्यांची तिला चांगली पसंती मिळत असते.

प्रार्थना बेहरे सध्या सुट्टयांचा आनंद घेताना दिसत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये ती शेवटची दिसली होती. या मालिकेमधील तिच्या नेहा या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. या मालिकेमुळे तिला छोटया पडद्यावर एक वेगळी ओळख मिळाली. प्रार्थनाने अनेक मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. मालिका, सिनेमा, इव्हेंट, फोटोशूट यातून वेळ मिळाला की प्रार्थनाचा रिल्स किंवा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर करायला तिला खूप आवडतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या