JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सगळीकडे शेपूट बरोबर ' प्राजक्ताची भाची आली आत्तूच्या शहरी अन् करतेय धमाल मस्ती

'सगळीकडे शेपूट बरोबर ' प्राजक्ताची भाची आली आत्तूच्या शहरी अन् करतेय धमाल मस्ती

प्राजक्ताची लाडकी भाजी आत्याला भेटायला शहरात आली आहे. प्राजक्ताने काही फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जून : अभिनेत्री प्राजक्ता माळी  ( Prajaktta Mali ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या कामाबद्दलच्या अपडेट ती नेहमीच चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करताना दिसते. याशिवाय ती तिच्या पर्सनल लाईफबद्दल देखील काही गोष्टी शेअर करत असते. कधी आईसोबतच्या ट्रीपचे फोटो तर कधी चिमुकल्या भांच्यासोबतची मस्ती, अशा अनेक गोष्टी ती शेअर करत असते. प्राजक्ताचं भाज्यांवरली प्रेम तर सर्वांच्या परिचयाचे आहे. आता प्राजक्ताची लाडकी भाजी आत्याला भेटायला शहरात आली आहे. प्राजक्ताने काही फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टयांसाठी सगळी बच्चे कंपनी मामाच्या गावाला रवाना झाली आहे. मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे बच्चे कंपनीला फिरता आलं नाही पण आता मात्र ही बच्ची कंपनी धमाल करताना दिसते. प्राजक्ता माळीच्या भावाची मुलगी देखील मामाकडं जायचं जोडून आत्याकडं आली आहे. प्राजक्तानं देखील तिच्या भाचीसोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. व एक छान पोस्ट देखील केली आहे. प्राजक्तानं म्हटलं आहे की, उन्हाळ्याच्या सुट्टीत पोरं “मामाच्या गावाला” जातात;ही “आत्तूच्या शहरी” आलीए. 😍(आजी आत्तूबरोबर एकटी दुबईला गेली होती म्हणून आजीला टूक टूक माकड करून ती आत्तूबरोबर एकटी मुंबईला आलीए 😂. घ्या…)शुटींग, इव्हेंट, योगा क्लास सगळीकडे शेपूट बरोबर आहे… 😅 #आत्तूभाची #याज्ञसेनी #सूट्टी #जीवाचीमुंबई #prajakttamali @♥️ प्राजक्ताच्या भाजीचं नाव याज्ञसेनी आहे. यापूर्वी देखील प्राजक्तानं या चिमुकलीसोबत व्हिडिओ असतील किंवा फोटो शेअर केली आहे. आत्याकडं याज्ञसेनी धमाल करताना दिसत आहे. आत्या भाज्या सुट्टय़ांचा मस्त आनंद घेत असल्याचेच फोटो पाहिल्यानंतर लक्षात येते.

संबंधित बातम्या

मागच्या काही दिवसांपासून प्राजक्ता माशी रानबाजार या सिरीजमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या सिरीजमुळी सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र असं जरी असलं तरी बोल्ड भूमिका करण्याचं धाडस दाखवल्याबद्दल तिचं कौतुकही झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या