निवेदिता सराफ यांना शॉपिंग करताना ब्रँडेड स्टोअरमध्ये आला वाईट अनुभव
मुंबई, 10 जून- मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी निवेदिता सराफ या एक आहेत. मालिका, सिनेमा आणि नाटक या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. सध्या त्या कलर्स मराठी वरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.निवेदिता सराफ या सोशल मीडियावर देखील सक्रीय असतात. नुकताच निवेदिता सराफ यांना शॉपिंग करताना एका स्टोअरमध्ये वाईट अनुभव आला आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. निवेदिता सराफ या नुकत्याच मुंबईतील इन्फिनिटी 2 मॉलमध्ये गेल्या होच्या. यावेळी त्यांना तिथं एका ब्रँडेड स्टोअरमध्ये चांगली वागणूक मिळाली नसल्याचा अनुभव त्यांनी सांगितला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मी मालाडच्या इन्फिनिटी 2 मॉलमधील ‘मॅक्स’मध्ये गेले होते. तिथे मला खूप वाईट अनुभव आला. तेथील कर्मचाऱ्यांना तुम्ही काय खरेदी करत आहात किंवा नाही याच्याशी काहीही फरक पडत नव्हता. ते कोणतीही मदत करत नव्हते. एक मुलगी आली आणि तिने दुसऱ्या कर्मचाऱ्याला सांगितलं की तिला वेळ नाहीये आणि ती निघून गेली. वाचा- शूटिंगदरम्यान प्रेम; रामचरणच्या भावाने या सुपरस्टार अभिनेत्रीशी केला साखरपुडा निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या की, तेव्हा तेथील एका व्यक्तीने मला ओळखलं तेव्हा त्याने माझी माफी मागितली आणि मॅनेजरला बोलावलं. मी एक लोकप्रिय चेहरा आहे म्हणून मला चांगली वागणूक हवी होती असं नाही. पण एक ग्राहक म्हणून मला चांगली वागणून देणं गरजेचं आहे. कारण ग्राहक म्हणून मी चांगली वागणूक डिझर्व्ह करते. फक्त मीच नाही तर त्या स्टोअरमध्ये येणारा प्रत्येक ग्राहक ते डिझर्व्ह करतो.
सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय त्यांच्या या पोस्टखाली अनेकांनी कमेंट करत त्यांना पाठिंबा दिला आहे. अनेकांनी आपल्याला देखील अशाप्रकारचा अनुभव आल्याचा कमेंटमध्ये नमूद केलं आहे.
सध्या निवेदिता सराफ यांचे‘मी स्वरा आणि ते दोघे’ हे नाटक रंगभूमीवर चांगलेच गाजताना दिसत आहे. या नाटकात निवेदिता यांच्याबरोबर सुयश टिळक, रश्मी अनपट हे कलाकारही झळकत आहेत. सध्या महाराष्ट्रातील विविध नाट्यगृहात या नाटकाचे प्रयोग पार पडताना दिसत आहेत.निवेदिता सराफ या उत्तम अभिनेत्री आहेतच शिवाय त्या उत्तम कूक देखील आहेत. त्यांचे यूट्यूब चॅनेल देखील आहे. विविध रेसिपी त्या या माध्यमातून शेअर करताना दिसतात. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. याशिवाय त्या मराठी सिनेमाबद्दल अनेक किस्से शेअर करताना दिसतात.