मुंबई, 7 मार्च - उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. घरातून बाहेर पडताना काळजी म्हणून अनेक जणी तोंडाला स्कार्फ बांधून बाहेर पडतात. त्यात हा कोरोना आहेच. त्यामुळे आपल्या शेजारी कोण बसलं आहे हे ओळखणं अवघड होतं. तुम्ही जर मुंबईच असाल तर प्रवासात असं तुमच्या शेजारी कोण स्कार्फ बांधलेले दिसलं तर कदाचित ती तुमची आवडती अभिनेत्री देखील असु शकते. हो.. एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिचे रिक्षानं प्रवास करत असल्याचे मुंबईतील काही फोटो शेअर केलं आहेत. हे फोटो पाहून तिला ओळखणं अवघड होतं आहे. ही अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे**( mukta barve )** होय. मुक्ता बर्वेने तिच्या इन्स्टावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा चेहरा पूर्णपणे स्कार्फने झाकलेला दिसत आहे. शिवाय डोळ्यावर देखील ग्लासेस आहेत. तिला ओळखणं देखील अवघड होत आहे. तिनं हे फोटो शेअर करच म्हटलं आहे की, ‘कॅच मी इफ यू कॅन… कदाचित तुमच्या शेजारच्या रिक्षामध्ये मी आहे.मुक्ता मुंबईत रिक्षामधून प्रवास करतेय. तिचे हे फोटो रिक्षातील आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून मात्र कमेंटचा वर्षाव होत आहे. वाचा- नाटकी कलाकारांची झुंडशाही..महेश टिळेकर यांची मराठी कलाकारांवर टीका एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, हाडाची पुणेकर😀 तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, स्पाईडर वुमन…तर आणखी एकानं म्हटलं आहे की, बाई करोना संपला आहे काळजी नसावी खरच 🙏🙏 तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, पुणेरी गुंड 😂😂😂😂😂 …अशा अनेक कमेंट तिच्या या फोटोंवर आल्या आहेत. नेमका मुक्ताने हा लुक कशासाठी केला आहे, हा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे. तिच्या आगामी प्रोजक्टचा हा भाग आहे का..असे अनेक प्रश्न तिचा हा नवीन लुक पाहल्यानंतर पडतात.
मुक्ता बर्वेची ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका नुकतीच संपली. या मालिकेत मुक्ता अभिनेता उमेश कामतसोबत दिसली होती. या मालिकेचा शेवटाचा सीन शुट करत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. एका गोष्टीच्या शेवटामध्ये दुसऱ्या गोष्टीची सुरवात लपलेली असते 💕 looking forward…अशी कॅप्शन तिनं या व्हिडिओला दिली होती. यातून तिनं तिच्या नव्या प्रोजक्टेबदल कादाचित माहिती देण्याचा काहीसा प्रयत्न केलाअसावा असा अंदाज देखील अनेकांनी लावला आहे.
कदाचित तिच्या नव्या प्रोजक्टची ही सुरूवात असावी ..असा देखील याचा अर्थ होतो. आता यावरून मुक्ता कधी मौन सोडते हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. हा तिच्या नवीन प्रोजक्टचा भाग आहे की तिनं गंमत म्हणून हे केलं आहे