JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्री बनली आई, मीनाक्षी-कैलासला कन्यारत्न प्राप्त

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्री बनली आई, मीनाक्षी-कैलासला कन्यारत्न प्राप्त

सध्या मनोरंजन सृष्टीत अनेक गुड न्यूज समोर येत आहेत. एकेकीकडे काही कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. तर दुसरीकडे काही कलाकार नव्या पाहुण्याचं स्वागत करत आहेत. काही दिवसांपूर्वीच मराठमोळी अभिनेत्री मीनाक्षी राठोडने (Minakshi Rathod) आपल्या प्रेग्नेन्सीची माहिती दिली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मे- सध्या मनोरंजन सृष्टीत अनेक गुड न्यूज समोर येत आहेत. एकेकीकडे काही कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. तर दुसरीकडे काही कलाकार नव्या पाहुण्याचं स्वागत करत आहेत. काही दिवसांपूर्वीच मराठमोळी अभिनेत्री मीनाक्षी राठोडने  (Minakshi Rathod) आपल्या प्रेग्नेन्सीची माहिती दिली होती. त्यांनतर चाहते फारच आनंदी झाले होते. या अभिनेत्रीला नुकतंच कन्यारत्न  (Blessed With Baby Girl) प्राप्त झालं आहे. अभिनेत्री मीनाक्षी राठोडने काही दिवसांपूर्वी आपण आई होणार असल्याची माहिती दिली होती. सोशल मीडियावर तिनं तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले होते. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर अप्रतिम प्रेग्नेन्सी ग्लो आला होता. हिरव्या आणि निळ्या रंगाच्या घागऱ्यामध्ये तिने हे फोटो शेअर केले होते. तिनं फुलांनी सजलेल्या झोपळ्यावर बसून हे फोटो काढले होते. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. नुकतंच राजश्री मराठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मराठमोळं सेलिब्रेटी कपल असणाऱ्या मीनाक्षी राठोड आणि कैलाश वाघमारे यांचा फोटो शेअर करत त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याचं जाहीर केलं आहे.

संबंधित बातम्या

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ( sukh mhanje nakki kay asta ) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखानींही लोकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. याच मालिकेतील देवकी ही भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोड  तिच्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसली होती. ही भूमिका खरं तर विनोदी नसून खलनायिकेकडे झुकणारी आहे. पण मीनाक्षीने तिच्या खास खट्याळ अंदाजाने या भूमिकेला विनोदी टच दिला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या