साजिद खान
मुंबई, 24 डिसेंबर : बॉलिवूड चा प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान सध्या ‘बिग बॉस 16’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. साजिद खानने बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतल्यापासून त्याच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. अनेकांनी अभिनेत्रींनी समोर येत त्याच्यावर गंभीर आरोप केले आणि बिग बॉसमधून बाहेर काढण्याची मागणीही केली. अशातच एका मराठी अभिनेत्रीने साजिद खानवर लैंगिग छळाचा आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा साजिद खानवर नेटकरी भडकले असून यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. मराठी अभिनेत्री जयश्री गायकवाडने साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. जयश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणते, ‘आठ वर्षांपूर्वी एका कास्टिंग डायरेक्टरने मला एका पार्टीला नेले होते. तिथे माझी भेट साजिद खानशी झाली. साजिदला भेटून आनंद झाला. दुसऱ्या दिवशी साजिदने मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं. तो म्हणाला की तो एक चित्रपट बनवत आहे आणि त्यात माझी भूमिका असू शकते. कार्यालयात प्रवेश केल्यापासून तो मला स्पर्श करू लागला आणि अश्लील कमेंट करू लागला. हेही वाचा - Bollywood Celebs First Job : कोणी रिपोर्टर तर कोणी शिक्षक; स्टार बनण्याअगोदर कलाकारांनी केलंय ‘हे’ काम जयश्री पुढे म्हणाली, ‘साजिद खानने मला सांगितले की तू खूप सुंदर आहेस पण मी तुला काम का देऊ? मग मी त्याला म्हणालो कि सर तुम्हाला काय हवे आहे. मी चांगला अभिनय करू शकतो. तेव्हा तो म्हणाला होता की फक्त अभिनय करून चालत नाही. मी सांगतो ते तुला करावं लागेल. त्यावेळी मला खूप राग आला होता. मला त्याला मारु वाटले होते, पण मी रागाने निघून गेले.
दरम्यान, साजिद खानवर डझनभर अभिनेत्रींनी आरोप केले आहेत. यामध्ये डिंपल पॉल, अभिनेत्री आहाना कुमरा, अभिनेत्री मंदाना करीमी, अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्रा, दिवंगत अभिनेत्री जिया खान आणि अभिनेत्री सिमरन सुरी त्याची एक्स असिस्टंट सलोनी चोप्राचाही समावेश आहे. साजिद खान बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यापासून त्यांच्यावर आरोपांचा भडिमार सुरु आहे. त्याने अनेकांसोबत लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत. मी टू मध्येही त्याचं नाव आलंय. त्यामुळे नेटकरी त्याच्यावर भडकले असून त्याला बिग बॉसमधून बाहेर काढण्याची विनंती करत आहेत.