JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सभा करायच्याच असतील तर अयोध्येत करून दाखवा, पुण्यात तर...' दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

'सभा करायच्याच असतील तर अयोध्येत करून दाखवा, पुण्यात तर...' दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

आज पुन्हा एकदा दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर पुण्यातील सभेवरून निशाणा साधला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 मे- आपल्या डान्सच्या कौशल्यानं सा-यांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद ( deepali syed ) या समाज कार्यत देखील सक्रीय दिसतात. याशिवाय दीपाली सय्यद सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असतात. तसेच आलीकडे त्यांचा राजकारणात देखील सहभाग वाढला आहे. मागच्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातून मनसे भाजपशी युती करणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंवर ( raj thackeray ) टिका होत आहे. अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपली सय्यद या मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहे. आज पुन्हा एकदा दीपाली सय्यद यांनी  राज ठाकरे यांच्यावर पुण्यातील सभेवरून निशाणा साधला आहे. दीपाली सय्यद यांनी पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेवरुन भाष्य केले आहे. दीपाली सय्यद यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, सभा करायच्याच असतील तर अयोध्येत करून दाखवा पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात तेही जास्त गर्दी करून. दीपाली सय्यद यांनी हे ट्वीट शिवसेना तसेच राज ठाकरे व मनसेला टॅग केलं आहे.

संबंधित बातम्या

दीपाली सय्यद यांनी  यापूर्ट्वीवी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत एक ट्वीट केलं होतं.  मोदींना खूश करण्याकरता जीवाचं रान करणाऱ्या राजसाहेबांनी अयोध्याच्या दौऱ्याकरीता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचीत माफीनाम्याची गरज पडणार नाही…असा टोला त्यांनी राज ठाकरेंना  ट्वीटमधून लावला होता. तसेच दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्याविषयी देखील एक ट्वीट केलं होतं. दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, “तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको”..अशा शब्दात त्यांनी अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. वाचा- अरुंधतीचं लेकीसोबत आहे खास बॉन्डिंग, क्यूट व्हिडिओत दिसला दोघींचा प्रेमळ अंदाज दीपाली यांनी अभिनयाशिवाय राजकारणातीह प्रवेश केला आहे. विविध मुद्द्यांवर लोकांना जागरुक करण्याचेही कार्य त्या करत असतात. पुरगस्तांची मदत असो किंवा मग मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारणं असो असे अनेक कार्यांत दीपाली यांनी लोकांची मदत केली आहे. -

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या