solapur
सोलापूर, 14 मार्च : सिनेमात काम देतो सांगून अभिनेत्रींची फसवणूक करणे, त्यांच्यावर अत्याचार करण्याच्या घटना काही नवीन नाहीत. मागील काही वर्षात ही प्रकरणं कुठे तरी कमी झालेली पाहायला मिळत होती मात्र महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातून असाच एक प्रकार समोर आला आहे. सिनेमात चांगलं काम देतो सांगून अभिनेत्रीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अभिनेत्रीनं दिग्दर्शकाविरोधात पांगरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.संजय पाटील असं दिग्दर्शकाचं नाव असून तो अहमदनगर येथे राहणारा आहे. या घटनेनंतर सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तक्रारीनंतर पोलीस या प्रकरणाता तपास करत आहेत. सोलापूरातील बार्शी येथे मराठी सिनेमात चांगला रोल देण्याचं आमिष दाखवून एका अभिनेत्रीवर अत्याचार करण्यात आलेत. मी तुला सिनेमाचा चांगले रोल देणार त्याकरिता तुला हे सर्व करावं लागेल, असं म्हणत दिग्दर्शकानं अत्याचार केल्याचं अभिनेत्रीनं तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 20 सप्टेंबर 2022 रोजीचा आहे. सिनेमाच्या वर्कशॉपवेळी एका महाविद्यालयात हा प्रकार घडल्याचं कळतं आहे. या प्रकरणाचा गुन्हा पांगली पोलीस ठाण्यात दाखल झाला अशून सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी जायपात्रे याचा पुढील तपास करत आहेत.