JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मराठमोळा अमेय वाघ दिसणार करण जोहरच्या 'या' सिनेमात

मराठमोळा अमेय वाघ दिसणार करण जोहरच्या 'या' सिनेमात

अमेय वाघने इन्स्टा पोस्ट करत त्याच्या आगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे. अमेय करण जोहरच्या आगामी सिनेमात झळकणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 नोव्हेंबर : मराठमोळा अभिनेता अमेय वाघ (amey wagh ) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. त्याचे काही फोटो, व्हिडीओ तसेच त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी माहिती शेअर करत असतो. नुकतीच अमेय वाघने त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयची एक महत्त्वाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. लवकरच अमेय वाघ करण जोहरच्या सिनेमात दिसणार आहे. अमेय वाघने इन्स्टा पोस्ट करत त्याच्या आगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे. अमेय करण जोहरच्या आगामी सिनेमात झळकणार आहे. ‘गोविंदा मेरा नाम’ असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी हे मुख्य भूमिकेत असणार आहे. वाचा :  विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नात सहभागी होणार हे बॉलिवूड स्टार्स? पाहा Guest List गोविंदा वाघमारे असं या सिनेमात विकीच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. शशांक खेतान या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. अमेय या सिनेमात कोणत्या भूमिकेत किंवा त्याचा नेमका रोल काय आहे याची माहिती मिळालेली नाही.

संबंधित बातम्या

चॅकलेट बॉय अभिनेता अमेय वाघ अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. अमेयने आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी सिनेमा, मालिका, रंगभूमी, वेबसीरिज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. दिल दोस्ती दुनियादारी ही अमेयची मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच मुरांबा, फास्टर फेणे, धुराळा यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. आता अमेय करण जहरच्या सिनेमात दिसणार आहेत. प्रेक्षकांना अमेयच्या भूमिकेविषयी उत्सुकता लागली आहे. वाचा :  अमोल कोल्हे यांच्या एकांतवासावरून पडदा हटला; स्वत: VIDEO पोस्ट करत सांगितलं कारण सध्या अनेक मराठी कलाकार हिंदी सिनेमात अभिनयाची छाप सोडत आहे. सई ताम्हणकर, पूजा सावंत तसेच देवदत्त नागे, अमृता खानविलकर यासारख्या अनेक कलाकारांनी हिंदी सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या