मुंबई 19 ऑक्टोबर : मराठमोळा अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) याला अभिनेत्री आयुषी भावेच्या (Ayushi Bhave) नावाची हळद लागली आहे. या दोघांचे हळदीचे फोटो (suyash tilak and ayushi bhave haldi ceremony) समोर आले आहेत. यामध्ये दोघे सुंदर दिसत आहे. सुयशचे हळदीचे फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का मिळाला आहे. सुयशचा आयुषीसोबत काही दिवसांपूर्वी साखरपुडा (Suyash Tilak and Aayushi Bhave engagement photo) झाला होता. सुयशने सोशल मीडियाच्या माध्यमातून साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. साखरपुड्यानंतर त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरून ते लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा होती. मात्र लग्न कधी याचा खुलासा सुयशने केला नव्हता. आता अचानक त्यांच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत. राजश्री मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या दोघांच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.
सुयश आणिआयुषीच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. कोरोनामुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये सुयश आणि आयुषीचा हळदीचा कार्यक्रम आज, 19 ऑक्टोबरला पार पडल्याची माहिती समोर आली आहे. सुयशने त्याच्या इन्स्टाला त्याच्या हळदीचे काही फोटो ठेवले आहेत. यामध्ये काही जवळचे मित्र व घऱची मंडळी दिसत आहे.सुयश 20 किंवा 21 तारखेला आयुषीसोबत लग्नगाठ बांधेल अशी चर्चा आहे.आद्याप या दोघांनीही लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र आज हळदीचा समारंभ झाल्याने उद्या किंवा परवा या दोघांचे लग्न असल्याची बोललं जात आहे. वाचा : Bigg Boss Marathi च्या घरात भातावरून वाद; सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई भिडल्या काही महिन्यांपूर्वी सुयश आणि आयुषीने साखरपुडा केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करून साखरपुड्याची आनंदाची बातमी दिली होती. या दोघांच्या साखरपुडा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. ‘माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री. तुझ्याबरोबर माझं आयुष्य पूर्ण झालं आहे आणि मी खूप भाग्यवान कारण माझ्याकडे तुझ्यासारखी सुंदर जीवनसाथी मिळाली. सांगण्यास आनंद होतोय, आम्ही ऑफिशिअली एंगेज झालो आहोत. आपल्या सर्व प्रियजनांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने आम्ही एकत्र नवीन प्रवास सुरू करतोय.’ अशी पोस्ट त्यावेळी सुयशने केली होती. वाचा : अमिताभ बच्चन- क्रिती सेनन यांचा Ballroom कपल डान्स पाहून तुम्हीही म्हणाल वाहवा! आयुषी भावे ही अभिनेत्री आणि लोकप्रिय डान्सर आहे. युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी भावे दिसली होती. आयुषी भावे लवकरच एका आगामी सिनेमात दिसणार आहे.