JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / पुणेकरांचं 'या' गोष्टीसोबत खास नातं; सुव्रत जोशीने केली भलीमोठी पोस्ट

पुणेकरांचं 'या' गोष्टीसोबत खास नातं; सुव्रत जोशीने केली भलीमोठी पोस्ट

मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशी ( Suvrat Joshi ) यांनी पुण्यासंबंधी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 05 ऑक्टोबर : प्रत्येकाचे आपल्या गाववर शहारावर प्रेम असते मात्र चर्चा होती ती फक्त आणि फक्त पुणेकारंच्या (Pune Love) प्रेमाची. पुणेकरांचा पुण्यावर खूप जीव आहे किंवा प्रेम आहे असे म्हणा. शेवटी काय पुणे तिथे काय उणे..असे सर्वजण म्हणत असतो. पुणेकरांची प्रत्येक गोष्ट खास आहे मग ती पुणेरी मिसळ असो की पुणेरी पाट्या. सर्वसामान्य जनता तर पुण्याच्या प्रेमात आहेच पण मराठी मनोरंजन विश्वातील काही कलाकार मंडळी आहे जी नेहमी पुण्यावरचे प्रेम व्यक्त करत असतात. आता मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशी ( Suvrat Joshi ) यांनी पुण्यासंबंधी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. सुव्रत जोशीने त्याच्या इन्स्टावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो आणि त्याची स्कुटर दिसत आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने पुणेकर आणि दुचाकीचे नाते सर्वांसमोर मांडले आहे.सुव्रत जोशीने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एखादा पुणेकर आणि टू व्हीलर यांचे नाते, काऊ बॉय आणि घोडे, अरब आणि उंट,denerys आणि dragon या परंपरेमधले आहे. माझ्या मते पुण्यातील दुचाकी वाहनांना मने असतात. अन्यथा पुण्यातील गल्लोगल्ली स्वतःला Fast and Furious मधले Vin “Diesel” समजणारे, “पेट्रोल” भरून आपापली वाहने Stuntman च्या आवेशात उधळतात तेव्हा काहीतरी दैवी शक्ती त्यांच्या पाठीशी असल्याची प्रचिती येते,ती आली नसती. कारण चालक आणि वाहन यापैकी किमान एकाकडे डोकं आणि मन असल्याशिवाय पुण्याच्या रस्त्यावर हा अव्याहत सावळा गोंधळ चालू राहणे अशक्य आहे. बहुतेक चालकांकडे ते जशी गाडी चालवतात ते पाहून ते एका वेळी डोके किंवा गाडी यापैकी एकच गोष्ट चालवू शकत असतील अशी दाट शंका येते. वाचा :वहिनीसाहेबां’चं छोट्या पडद्यावर कमबॅक, अभिनेत्रीचे PHOTOS झाले व्हायरल खरंतर पुणेकर हे फार मोठे कलाकार आहेत असेच म्हटले पाहिजे. कुठल्याही सिग्नल ला समोर खांबावर असलेल्या लाल, पिवळ्या आणि हिरव्या या साध्याशा रंगांचे प्रत्येक जण दरवेळी किती वेगवेगळे अर्थ लावत जातो. त्यामुळे कधी लाल रंग पाहून जोरात पुढे जाणे,पिवळा पाहून यू टर्न,हिरवा पाहताच फूट पाथवरून गाडी पुढे घालणं असे नवनवे सृजन निर्माण करणे त्यांना शक्य होते. रस्ता हा एखादा कोरा कॅनव्हास आहे आणि एकाच वेळी स्वच्छंद मनोवृत्तीचे अनेक अमुर्त चित्रकार त्यांच्या दुचाकिरुपी ब्रशने मनसोक्त फटकारे मारत आहेत असेच (अमूर्त) चित्र चौकाचौकात दिसून येते. किती छान! वाचा : जेव्हा लग्नाआधी Monalisaने बिग बॉसच्या घरातचं केला होता प्रेग्नेंट असल्याचा खुलासा पण या दुचाक्यांना मन असते हे सिद्ध करायला पुरेसा पुरावा आहे. बघा ना, कित्येक होतकरू तरुण हे पुढे जाऊन अमेरिकेत सेटल होण्याची किंवा मोदींनी ट्रम्प प्रमाणे भारताचा अमेरिका बनवण्याची दिवास्वप्ने पाहत असल्याने, त्यांच्या दुचाक्या त्यांच्या मनातले ओळखून उजव्या बाजूने जाऊ लागतात. सणासुदीला, सार्वजनिक उत्सवात तर भारतीय संस्कृति जपता जपता या दुचाक्या कधी भारतीय वाहतुकीची नियमावली विसरून जातात ते कळतच नाही. विचारांची गाडी उजवीकडे असली (ती काही आम्ही वळवू शकत नाही) तरी पार्श्वभागाखालची गाडी डावीकडून जायला काय हरकत आहे असा आपला माझ्या बापुड्या चा केविलवाणा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या

कधी कधी दोन दुचाक्या मालकांच्या अत्यंत महत्त्वाच्या चर्चासत्रात व्यत्यय येऊ नये म्हणून स्वतःच समांतर चालत राहून चारचाकी तयार करतात. तर पुण्यातील रिक्षावाल्यांना “नाही” या एकाच शब्दाचे उच्चारण करता येत असल्याने स्वतःची पाठ मोठी करून तिघांचा भार उचलून स्वतःची रिक्षा करतात. ही भली मोठी पोस्ट संपलेली नाही तर सुव्रतने चाहत्यांना पुढील भाग कमेंटमध्ये पूर्ण करण्यास सांगितला आहे. चाहत्यांनी देखील यावर कमेंटचा वर्षाव सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या