JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मी पण 'या' हॉलिवूड अभिनेत्यासारखा दिसतो', संतोष जुवेकरनं 'तो' फोटो पोस्ट करत सांगितलं सत्य

'मी पण 'या' हॉलिवूड अभिनेत्यासारखा दिसतो', संतोष जुवेकरनं 'तो' फोटो पोस्ट करत सांगितलं सत्य

संतोष जुवेकरनं हॉलिवूड अभिनेत्याचा फोटो शेअर करत आपण देखील आधार कार्डवरील फोटोत या अभिनेत्यासारखचं दिसत असल्याचं म्हटलंय आहे. सध्या संतोषची ही पोस्ट आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

जाहिरात

अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जून- अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो नेहमीच त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. याशिवाय कामाच्या अपडेट देखील शेअर करत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून संतोष नेहमीच चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतो. संतोषने आज एक असात फोटो शेअर केला आहे. त्यात हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजसारखे दिसणारे तिघे जण आहेत. हा फोटो शेअर करत आपण देखील आधार कार्डवरील फोटोत टॉमसारखेच दिसत असल्याचं संतोषने म्हटलंय आहे. सध्या संतोषची ही पोस्ट आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर कधी एकदा फोटो तर कधी व्हिडिओ व्हाटरल होईल हे सांगता येत नाही. हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजचा एक असाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोत तीन जण दिसत आहेत आणि ते तिघेही एकसारखेच दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर वेगवेगळ्या कॅप्शनने व्हायरल होत आहे. काहींच्या मते हा आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सने तयार केला आहे, तर काहींच्या मते या फोटोतील एक खरा टॉम असून इतर दोघे त्याचे बॉडी डबल आहेत. हाच फोटो संतोष जुवेकरने शेअर केला आहे आणि त्याला मजेशीर कॅप्शन देखील दिली आहे. वाचा- शूटिंगदरम्यान प्रेम; रामचरणच्या भावाने या सुपरस्टार अभिनेत्रीशी केला साखरपुडा संतोष जुवेकरने फोटो शेअर करत म्हटलं आहे की, जर हा फोटो खरा असेल तर असा सेम कुणी माझ्यासारखाच दिसणारा असेल तर मला फोटो पाठवा. एकाच वेळेला खूप कामं आली तर वाटून घेता येतील. खरंच पाठवा आणि मला टॅग करा. एकमेका सहाय्य करू अवघे मिळवू यश. ए टॉम्या तुलापण टॅग केलंय. तू पण पाठवू शकतोस बरं का तुझा फोटो. तुझ्या आधार कार्डवरील फोटो सारखाच दिसतो मी. काळजी करू नको, आपण सारखेच आहोत.

मालिका, चित्रपट, नाटक सर्व प्लॅटफॉर्म्सवर आपली जादू दाखवणारा संतोष सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय पाहायला मिळतो. अनेक निरनिराळ्या पोस्ट तो शेअर करत असतो. त्याच्या आगामी प्रोजक्टविषयी माहिती तो देत असतो. सोशल मीडियावर अनेकदा तो आपले वर्कआउट व्हिडीओस शेअर करत असतो.

संबंधित बातम्या

त्यानंतर त्याला अनेक कमेंट्सही मिळतात.संतोष जुवेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ या मराठी चित्रपटांमध्ये (Marati Movie) दमदार भूमिका साकारल्या. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या