सागर तळाशीकर
मुंबई, 25 जुलै- पुणे आणि वाहतूक कोंडी हे समीकरणचं झालं आहे. दररोज या पुण्याच्या वाहतून कोंडीची चर्चा होत असते. पुणेकर तर याला त्रासलेच आहेत, आता आता या पुण्याचा वाहतून कोंडीचा अनुभव नुकत्याच एका मराठमोळ्या अभिनेत्याला आलेला आहे. तब्बल पाच तास अभिनेता त्याच्या 85 वर्षांच्या आईबरोबर पुण्यातल्या वाहतूक कोंडीत अडकला होता. सोशल मीडियावर पोस्ट करत या अभिनेथ्याने आपली व्यथा मांडली आहे. हा अभिनेता म्हणजे सागर तळाशीकर होय. सागर तळाशीकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पुण्यातील वाहतूक कोंडीचा अनुभव शेअर केला आहे. त्यानंतर या लाईव्हचा व्हिडिओ त्यानं पोस्ट करून म्हटलं आहे की, मित्रहो, हा काल दिनांक 24 जुलैचा व्हिडिओ आहे. मी दुपारी 1.३30 ते 7. 30पुण्यातल्या वाहतूक कोंडीत अडकलो होतो. 8.30 ला पुण्यात घरी पोहोचलो. म्हणजे पुण्यात शिरल्यावर आम्ही एकाच पुलावर 5 ते 6 तास होतो. यादरम्यान 700 किंवा 800 मीटर मागे पुढे झालो असू इतकेच. वाचा- अरुंधती पुन्हा एकदा झाली सासू; अनिरुद्धच्या नाकावर टिच्चून इशा-अनिश करणार लग्न कुणीही तिथे ट्राफिक कंट्रोल ला नव्हते … माझी 85 वर्षांची आई जिच नुकतंच मोतीबिंदू ऑपरेशन झालं आहे ती पण न खाता बरोबर होती. तिच्या शुगर वगैरे इतर गोळ्या पण घ्यायच्या होत्या… असेच आणखी कितीतरी वृद्ध, स्त्रिया, मुलं, पेशंट्स असतील त्यानी करायचं काय ? स्त्रियांचे बाथरूमच्या प्रॉब्लेमच काय करायचं? काय झालंय हे सांगायलाही कुणी नाही.
7.30ला तिथून सुटलो तेव्हा बघितलं, तिथं कुणीही त्या ट्राफिकला कंट्रोल करायला, वाहतूक सुरळीत व्हायला मदत व्हावी म्हणून दिशा दर्शविणारा एकही ट्राफिक किंवा पोलीस नव्हता, कुणी कार्यकर्ते पण नव्हते ..भयंकर आहे हे …. शक्य असल्यास शेअर करा … चुकून काही कारावसं वाटलं संबंधिताना तर इतराना उपयोगी पडेल .. शक्यता कमीच आहे पण तरी …. सर्वांचे मनःपूर्वक आभार .. आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि आई उत्तम आहे .. 🙏🙏🙏