मुंबई, 20 जानेवारी - मागील नऊ दिवसांपासून सोशल मीडियावर एका चिमुरड्याचा पुण्यातून (Pune) अपहरण (Kidnapping) करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या धक्कादायक घटनेनंतर काल , 19 जानेवारीला स्वर्णव चव्हाण (Swarnav satish chavhan) हा चिमुरडा आपल्या आईच्या खुशीत सामावला आहे. तब्बल 9 दिवसांनंतर या चिमुरड्याला अपहरणकर्त्याने सोडून दिले, या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. आता हस्यजत्रा फेम मराठी अभिनेत्याने (prasad khandekar ) देखील यासाठी पुणे पोलिसांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक केले आहे. पुण्याचा चार वर्षाचा स्वर्णव चव्हाण सापडल्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेता प्रसाद खांडेकर याने एक इन्स्टा पोस्ट केली आहे. प्रसादने या पोस्टच्या माध्यामातून पुणे पोलिसांचे आभार मानले आहे. सोबतच त्याने स्वर्णवचा त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, डॉ. सतीश चव्हाण यांचा मुलगा स्वर्णव (डुग्गु) पूनावळे येथे सुखरूप सापडला. अपहरण झालेला स्वर्णव आज आपल्या आईवडिलांसोबत आहे. पुणे पोलिसांचे मनापासून आभार, अभिनंदन आणि त्रिवार वंदन. त्याच्या या पोस्टनंतर अनेकांनी पुणे पोलिसांचे आभार मानत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे भागात स्वर्णव सापडला आहे. डॉक्टर दाम्पत्याच्या या मुलाला पुणे पोलिसांनी शोधून काढलं आहे. घटनेचा बोभाटा झाल्यानंतर घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी स्वत:च त्याची सुटका करून पळ काढला असावा, असा संशय पोलिसांना आहे. स्वर्णवचं अपहरण कुणी केलं? आणि 9 दिवस तो कुठे होता? याबाबत अद्याप कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. वाचा- VIDEO पुष्पा नाव ऐकून गुलाबाच फुल वाटलो काय…Pushpa चा मराठमोळं व्हर्जन पुणे पोलिसांकडून चिमुकल्याची चौकशी केल्यानंतर या अपहरण नाट्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.तब्बल नऊ दिवसांनी स्वर्णव सुखरुप सापडल्याने कुटुंबाच्या जीवात जीव आला आहे. पोलिसांनी स्वर्णवची त्याच्या आई वडिलांशी भेट घडवून दिली आहे.