JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'पोरी मला काम दे'; मराठी अभिनेत्यावर आली युट्यूबरकडे काम मागण्याची वेळ, Video

'पोरी मला काम दे'; मराठी अभिनेत्यावर आली युट्यूबरकडे काम मागण्याची वेळ, Video

कामाच्या शोधात असलेल्या एका मराठी कलाकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. ‘पोरी मला काम दे’ असं म्हणत त्यांच्यावर एका युट्यूबरकडे काम मागण्याची वेळ आली आहे.

जाहिरात

अभिनेते मनमोहन माहिमकर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जुलै : काही दिवसांआधीच एकेकाळी लावणी सम्राज्ञी म्हणून किताब मिळणाऱ्या शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर यांना एका बस स्टेशनवर वाईट परिस्थितीमध्ये पाहाण्यात आलंय. आपल्या सौंदर्यानं घायाळ करणाऱ्या शांताबाई यांची उतार वयात झालेली अवहेलना पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. असे अनेक कलाकार आजही आपल्या समाजात आहेत ज्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. कामाच्या शोधात असलेल्या अशाच एका मराठी कलाकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. ‘पोरी मला काम दे’ असं म्हणत त्यांच्यावर एका युट्यूबरकडे काम मागण्याची वेळ आली आहे. मनमोहन माहिमकर असं त्या मराठी अभिनेत्याचं नाव आहे. अंकिता वालावलकर ही मराठमोळी मुलगी कोकण हार्टेड गर्ल नावानं तिचं युट्यूब चॅनेल चालवते. केवळ सोशल मीडियावर डिजिटल क्रिएशन न करता अनेक समाजिक विषयावर ती बोलत असते.  मुंबईच्या गिरगावात शुटींगसाठी गेली असता अंकिताला मनमोहन माहिमकर यांच्याबद्दल समजलं. त्यांनी अंकिताकडे येऊन मला काम दे पोरी अशी विनंती केली. अंकिताने त्यांचा व्हिडीओ तिच्या अकाऊंटवरून शेअर केलाय. हेही वाचा - ‘मी याचा एक भाग होते…’ मालिका संपताच आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीची भावुक पोस्ट व्हिडीओमध्ये अंकिता सांगताना दिसतेय की, “गिरगावमध्ये माझं शुटींग होतं तेव्हा मला माहिमकर काका भेटले. मी त्यांना लहानपणापासून स्क्रिनवर पाहत आले आहे. त्यांना आमच्याबरोबर शुट कराल का? असं विचारलं तेव्हा ते लगेच तयार झाले. मी शुटवरून निघताना त्यांनी मुली मला काम देशील का अशी विनंती केली. मला कामाची गरज आहे. माझं लग्न झालेलं नाही माझ्याकडे वेळ घालवण्यासाठी माझं कुटुंब नाही. मला काम द्या ज्यामुळे माझा वेळ जाईल. मी पैसे कमवू शकेन. मला फक्त पैसे नकोत मला काम हवंय. मला इच्छामरणसुद्धा चालेल पण त्यासाठई मी भारतात अर्ज करू शकत नाही”, असं मनमोहन माहिमकर म्हणाले.

संबंधित बातम्या

अंकिता पुढे म्हणाली, “काकांचं हे बोलणं ऐकून मी त्यांना एवढंच म्हणाले की, तुम्हाला काम देण्याइतकी मी मोठी नाही. पण सिनसृष्टीतील माझ्या संपर्कात असलेल्या मंडळींपर्यंत मी तुमचा मेसेज नक्कीच पोहोचवेन. तुम्हाला नक्की काम मिळेल ज्यामुळे तुमचा वेळ जाईल आणि तुमचं शेवटचं आयुष्य खूप सुखात जाईल”.

अभिनेते मनमोहन माहिमकर हे गेली अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टीत काम करत आहेत. अनेक मालिका, सिनेमांमध्ये ते छोट्या छोट्या भूमिकांमध्ये दिसत असतात. अनेक विनोदी सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यांचा आवाज हा विशेष लोकप्रिय आहे. बऱ्याच सिनेमांमध्ये ते दादा कोंडके स्टाइलमध्ये दिसले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या