JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / भाग्यश्री लिमये नाही तर या व्यक्तीच्या प्रेमात आहे भूषण प्रधान, फोटो पोस्ट करत म्हणाला...

भाग्यश्री लिमये नाही तर या व्यक्तीच्या प्रेमात आहे भूषण प्रधान, फोटो पोस्ट करत म्हणाला...

भूषण प्रधानाचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. संस्कृती बालगुडे, पूजा सावंत, भाग्यश्री लिमये यांच्यासोबत तो बऱ्याचवेळा स्पॉट झालेला पाहायला मिळाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 मार्च- अभिनेता भूषण प्रधान**(Bhushan Pradhan)** सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच त्यानं एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे विविध चर्चां रंगल्या (Relationship) आहेत. भूषण प्रधानाचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. संस्कृती बालगुडे, पूजा सावंत, भाग्यश्री लिमये यांच्यासोबत तो बऱ्याचवेळा स्पॉट झालेला पाहायला मिळाला. पूजा सावंत, भूषण प्रधान आणि वैभव तत्ववादी यांची मैत्री तर अनेकांना माहीत आहे. मात्र तो भाग्यश्री लिमये (Bhagyashree Limaye) सोबत रिलेशनशिपमध्ये असावा असे अनेकदा बोलले जात होते. मात्र आता या चर्चांना ब्रेक मिळाल्याचे दिसत आहे. कारण भूषणने प्रथमच इन्स्टावर त्याच्या आयुष्यातील खास  (Bhushan Pradhan Vaishali Mahajan) व्यक्तीसोबत एक रोमॅंटिक पोझमध्ये फोटो शेअर केला आहे. एवढचं नाही तर त्याला कॅप्शन काय द्यायचे हे देखील विचारलं आहे. ही भूषणची गर्लफ्रेड असल्याची चर्चा आहे. चाहत्यांनी देखील या फोटोखाली लाल रंगाच्या हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत. भूषणच्या आयुष्यातील या खास व्यक्तीचे नाव वैशाली महाजन आहे. वैशाली ही देखील कलाक्षेत्रात कार्यरत आहे. रचना संसद कॉलेजमधून वैशालीने फाईन आर्टसचे शिक्षण घेतले. गेल्या पाच वर्षांपासून ती आर्ट डायरेक्टर म्हणून जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहे. याच माध्यमातून भूषण आणि वैशालीशी ओळख झाली आहे.

वैशालीने अनेकदा भूषण सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यामुळे भूषण वैशालीला डेट करत असल्याची चर्चा रंगलेली आहे. त्याने पोस्ट केलेल्या फोटोवरून वैशाली त्याची गर्लफ्रेंड असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भूषणने भाग्यश्री लिमयेच्या वाढदिवसदिवशी एक खास पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्याने,‘मी किती खास आहे याची जाणीव तू मला कसं करून देते हे वर्णन करण्यासाठी कोणतेही शब्द पुरेसे नाहीत. तू जशी आहेस तशीच राहा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ’ यावरून हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता भूषणने पोस्ट केल्याल्या या फोटोंवरून या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या