मनोज बाजपेयी-शबाना रजा लव्ह स्टोरी
मुंबई,6 मे- एक अत्यंत प्रतिभावान अभिनेता असूनही, मनोज वाजपेयी नेहमीच ग्लॅमरपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. मनोज वाजपेयी बॉलिवूड पार्ट्यांमध्ये फारच कमी दिसून येतात. त्यामुळेच त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत कोणालाही फारशी माहिती नसते. 2019 च्या ‘द फॅमिली मॅन’मधून लोकांना वेड लावणारे मनोज वाजपेयी खऱ्या आयुष्यातसुद्धा एक ‘फॅमिली मॅन’चं आहेत. त्यामुळेच ते आपल्या कामातून वेळ मिळताच आपल्या पत्नी आणि मुलांसोबत एन्जॉय करणं पसंत करतात. अनेकांना
मनोज वाजपेयी
यांच्या लव्हस्टोरीबाबत जाणून घेण्याची इच्छा असते. मनोज वाजपेयी यांच्या खाजगी आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, त्यांनी दोन लग्न केले आहेत. बिहारमधील एका ग्रामीण शेतकरी कुटुंबात जन्मलेले मनोज शिक्षणासाठी दिल्ली विद्यापीठात आले होते. याकाळातच त्यांच्यात अभिनेता होण्याची इच्छा निर्माण झाली होती. परंतु नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून तीनदा रिजेक्ट झाल्याने ते डिप्रेशनमध्ये गेले होते. तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना धीर दिला. त्यांनंतर त्यांनी बॅरी जोन्सच्या कार्यशाळेत भाग घेतला. बॅरी जोन्सने त्याच्यातील कलाकाराला ओळखलं. आणि त्यांना ‘सत्या’ चित्रपटात काम मिळाले. याच चित्रपटातून त्यांना जगभरात ओळख मिळाली होती. (हे वाचा:
Shweta Bachchan Husband: कोण आहे अमिताभ बच्चन यांचा जावई? श्वेता बच्चनच्या पतीविषयी वाचा ‘या’ गोष्टी
) बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ज्यावेळी ते स्ट्रगल करत होते, तेव्हा ते विवाहित होते. परंतु स्ट्रगलच्या काळात त्यांचे त्यांच्या पत्नीशी सतत खटके उडत होते. त्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मनोजची पहिली पत्नी बिहारचीच होती. घटस्फोटानंतर मनोज यांच्या आयुष्यात आता त्यांची दुसरी पत्नी असणारी शबाना अर्थातच नेहाची एन्ट्री झाली होती. शबानाच्या येण्याने मनोज यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुखी झालं होतं. निर्माते हंसल मेहता यांच्या एका पार्टीमध्ये मनोज वाजपेयींनी पहिल्यांदा शबाना रजाला पाहिलं होतं. यावेळी शबाना डोक्याला चपचपीत तेल, नो मेकअप आणि अगदी साधा ड्रेस परिधान करुन पोहोचली होती. एक अभिनेत्री असूनसुद्धा शबानामध्ये असलेला हा साधेपणा मनोज यांना प्रचंड पसंत पडला. पाहताच क्षणी मनोज शबानाच्या प्रेमात पडले होते. इथूनच त्यांची मैत्री झाली. आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं होतं. जवळपास 8 वर्षे एकेमकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. दरम्यान शबानाने आपला धर्मांतर करत आपलं नाव नेहा असं ठेवलं आहे.
शबाना रजा अर्थातच नेहा वाजपेयी हीसुद्धा एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. नेहाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नेहाने अभिनेता बॉबी देओलसोबत ‘करीब’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.