JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन /  Manike Mage Hithe फेम Yohaniची बॉलिवूडमध्ये एंट्री; 'या' सिनेमातून करणार पदार्पण

 Manike Mage Hithe फेम Yohaniची बॉलिवूडमध्ये एंट्री; 'या' सिनेमातून करणार पदार्पण

‘ Manike Mage Hithe फेम Yohaniचाआवाज आता लवकरच बॉलिवू़डमध्ये घुमणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 19 ऑक्टोबर :  मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका गाण्याने नुसता धुमाकूळ घातला आहे. ते गाणं म्हणजे ‘माणिके मगे हिते’  **(manike mage hithe )**होय. श्रीलंकेतील सिंगिंग सेंसेशन असलेल्या योहानीने  (manike mage hithe fame singer yohani)  सिंहली भाषेत हे गाणं गायलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आणि सेलेब्सपासून ते सर्वसामान्य जनता या सर्वांनीच या गाण्यावर रील बनवत सोशल मीडियावर रीलचा महापूरच आणला. या गाण्यामुळे योहानीला चांगलीच प्रसिद्धी देखील मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच योहानीने ‘बिग बॉस 15’च्या मंचावर देखील हजेरी लावली होती. यावेळी सलमानने योगाही सोबत तिचं गाणं गाण्याचा प्रयत्न केला होता. आता योहानीच्या आवजाचा जलवा बॉलिवूडमध्ये दाखवणार आहे. योहानी आता बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. भूषण कुमार यांची निर्मिती असलेल्या ‘थँक गॉड’ (thank god )या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात योहानीच्या या सुपरहिट गाण्याच्या हिंदी वर्जनचा समावेश करण्यात आला असून हे गाणं योहानीच गाणार आहे. तर बॉलीवूड सिनेमासाठी गाण्याची संधी मिळाल्याने योहानीने देखील आनंद व्यक्त केला आहे. या गाण्यासाठी ती पुन्हा लवकरच भारतात येणार आहे.

संबंधित बातम्या

‘थँक गॉड’ हा सिनेमा रोमॅण्टिक कॉमेडी आहे. या सिनेमात अजय देवगन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 2022 सालामध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर या सिनेमातील योहानीचं ‘माणिके मगे हिते’ हे गाणं तनिष्कने कंपोज केलं आहे. रश्मी विराजने या गाण्याचे हिंदी बोल लिहिले आहेत. लकरच या गाण्याचं शूटिंग सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे योहानीचा आवाज आता बॉलिवू़डमध्ये देखील घुमणार आहे. वाचा : Bigg Boss Marathi: ‘तो डबल गेम खेळतोय’, ग्रुपमधील कोणत्या व्यक्तीवर विकासने व्यक्त केला संशय? योहानी कोण आहे ? मणिके मगे हिते…या गाण्याला करोडोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाल्या आहेत. श्रीलंकन गायिका. योहानी डीसिल्वा या गायिकेने हे गाणं गायलं आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथे राहणारी योहानी गायिका, गीतकार आणि संगीतकारही आहे. तिनं आपल्या करिअरची सुरुवात युट्यूबच्याच माध्यमातून केली होती. श्रीलंकेत ती रॅप प्रिन्सेस या नावानं ओळखली जात होती. आता मात्र योहानीची एक वेगळीच ओळख तयार झाली आहे. हे गाणं मूळ सिंहली भाषेत लिहिलं गेलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या गाण्याचे अनेक व्हर्जनही सादर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. वाचा : Bigg Boss15: बिग बॉसच्या घरात मोठा धमाका; आठवड्याच्या मधेच 2 स्पर्धकांना दाखवला बाहेरचा रस्ता योहानीनं गायलेलं हे गाणंही रिक्रिएटेड व्हर्जन आहे. याचं मुळ गाणं 2020 जुलै महिन्यात Satheeshan आणि दुलान एआरएक्सनं सादर केलं होतं. ज्यानंतर 2021 मध्ये योहानीने हे गाणं तिच्या शैलीत सादर केले आणि ते सगळीकडे व्हायरल झालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या