JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आत्तापर्यंतची झी ची सर्वांत फालतू सीरियल..' मन उडू उडू झालं मालिकेवर भडकले प्रेक्षक

'आत्तापर्यंतची झी ची सर्वांत फालतू सीरियल..' मन उडू उडू झालं मालिकेवर भडकले प्रेक्षक

झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ ( Man Udu Udu Zhala) ही मालिका मागच्या काही दिवसांपासून सततच्या ट्वीस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.मात्र या सगळ्या ट्वीस्टला ( Man Udu Udu Zhala Troll ) प्रेक्षक मात्र कंटाळले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 एप्रिल- झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ ( Man Udu Udu Zhala) ही मालिका मागच्या काही दिवसांपासून सततच्या ट्वीस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. इंद्रा आणि दीपू प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. दीपा आणि इंद्राच्या प्रेमाची खबर तिच्या आईला लागली आहे. त्यामुळे दिपूची आई तिच्यावर प्रचंड नाराज झाली आहे. देशपांडे सरांनी आपली तत्व कायम जपली आहेत, मात्र आपल्या पाठीमागे आपली लाडकी मुलगी दिपू इंद्राच्या प्रेमात गुंतलेली आहे. हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हा ते या लग्नाला परवानगी देणार की नाहीत याचा उलगडा ( Man Udu Udu latest Update) येणाऱ्या भागातच होणार आहे. मात्र या सगळ्या ट्वीस्टला ( Man Udu Udu Zhala Troll ) प्रेक्षक मात्र कंटाळले आहेत. मालिका सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. सानिका आता तिच्या सासरी राहायला गेली आहे. मात्र सासरी गेल्यानंतरही ती तिच्या कुरघोड्या अधिकच वाढवत चालली आहे. तर दीपूचं सत्य समजल्यापासून मालती मात्र चिंतेत आहे. यासंबंधीच झी मराठीनं नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दीपची आई मालती दीपूला इंद्रापासून लांब राहण्याचा सल्ला देत आहेत. या सगळ्या प्रकारावरन प्रेक्षक मात्र मालिकेवर चांगलेच भडकले आहेत. प्रेक्षकांनी वाटेल तशा कमेंट करत मालिकेला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.

एका नेटकऱ्यांने म्हटलं आहे की, ही आत्तापर्यंतची झी ची सर्वांत फालतू सीरियल आहे…..काय आणि कशाला दाखवता त्यांना त्यांचंच माहिती…तर दुसऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की,ही बाई नुसती डोळे मोठे करते नी फिरवते no acting…. दोन रिअल गुंड जावई करून घेतलेत, what a joke. Madam सानिकाच्या पाठी नाही गेलात कधी ती गुण उधळत असताना.. दोन्ही मुलींना घरात कसं काय बसवलत, धाकटी नोकरी करतेय, परिक्षा देतेय, आणि ही मला पैसे पाहिजे, हे पाहिजे नी ते पाहिजे. हल्ली कोणी घरी नुस्त बसत का? आणि बसल तरी अश्या demands…. MG.तर आणखी एकानं म्हटलं आहे की,ही आत्ता पर्यंत झी ची सर्वांत फालतू सीरियल आहे…..काय आणि कशाला दाखवता त्यांना त्यांचंच माहिती…

संबंधित बातम्या

एकानं तर चक्का ही मालिका बंद करा अशीच मागणी केली आहे. तर आणखी एकानं म्हटलं आहे की,सानिका,कडे,लक्ष,दिल,नाही,दिपूला,इद्राला,भेटू,देत,नाही,वा..तर दुसऱ्याने म्हटलं आहे की,@ajinkyathoughts आणि @hruta12 खूप छान काम करतात! TVवरची बेस्ट जोडी आहे! ❤️ पण जरा कथा बरी केली तर पहायला बरं वाटलं असतं अजून!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या