JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अरबाज खानमुळे मलायकाची मॉडेलसोबत होतायत भांडणं ?

अरबाज खानमुळे मलायकाची मॉडेलसोबत होतायत भांडणं ?

मलायका आणि तिच्या शोमधील एक मॉडेल यांच्यात खूप भांडणं होत आहेत आणि याचं कारण अरबाज खान असल्याचं म्हटलं जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 डिसेंबर : मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी घटस्फोट घेऊन आता जवळपास 2 वर्षं उलटली. एवढंच नाही तर हे दोघंही आता आपापल्या पार्टनरसोबत खूश आहेत. अनेकदा काही ना काही कारणानं हे दोघंही चर्चेत येतात. आता नुकतंच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मलायका आणि तिच्या शोमधील एक मॉडेल यांच्यात खूप भांडणं होत आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेलं मात्र या भांडणाचं कारण अरबाज खान आहे. मलायका अरोरा पुन्हा एकदा तिचा टीव्ही शो ‘एमटीवी सुपरमॉडल ऑफ द ईयर’चा नवा सीझन घेऊन येत आहे. याशोमध्ये मलायका अरोरा, मिलिंद सोमन आणि डिझायनर मसाबा गुप्ता परीक्षक म्हणून काम पाहणार आहे. तर या शोमध्ये सुपर मॉडोल उज्वल्ला राउत या सर्व मॉडेल्सची मेंटर म्हणून काम पाहणार आहे. सध्या या शोचं शूटिंग सुरू असून पिंकव्हिलानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार उज्वल्ला आणि मलायका यांच्यात मागच्या काही दिवसांपासून खूप भांडणं होत आहेत. त्यामुळे या शोच्या मेकर्सना बऱ्याच समस्यांना द्यावा लागत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शोच्या सेटवर या दोघींची जबरदस्त कॅटफाइट होत आहे. रितेशच्या Love You मेसेजला विद्याकडून आला KISSING स्माईलीचा रिप्लाय आणि…

या शोचे मेकर्स भांडण व्हायला नको म्हणून दोघींचही वेगवेगळं शूट करत आहे. उज्वल्ला तिच्या आणि अरबाजच्या नात्याचा दिखावा या शोच्या सेटवर करत आहे. याशिवाय ती नेहमीच अरबाजनं तिला पाठवलेले मेसेज आणि फोटो क्रू मेंबर्सना दाखवत असते. असं काही करुन ती नेहमीच या सेटवर चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. …म्हणून बर्थडे बॉय जाॅन अब्राहम वयाच्या 47 व्या वर्षीही आहे इतका फिट

जाहिरात

दुसरीकडे मलायका मात्र या सर्व प्रकारामुळे खूपच त्रासली आहे. पण तरीही तिनं तिचं संतुलन ढळू दिलेलं नाही. ती हा सर्व प्रकार मोठ्या सफाईदारपणे हाताळत आहे. या शोमध्ये देशभरातून आलेल्या 10 तरुणी मॉडेलिंगच्या जगात स्वतःला पारखण्याचं काम करणार आहेत. या शोमध्ये त्यांना वेगवेगळ्या कॉन्टेस्ट पार करायच्या आहेत. ज्यानंतर या 10 मॉडेल्समधून एक सुपर मॉडेल निवडली जाणार आहे. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या मुलीने केली कमाल! शेअर केले HOT PHOTOS

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या