JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'ह्या बयाकडे दुसरे कपडे नाहीत का?' ; Malaika Arora पुन्हा ड्रेसिंग स्टाईलवरून ट्रोल

'ह्या बयाकडे दुसरे कपडे नाहीत का?' ; Malaika Arora पुन्हा ड्रेसिंग स्टाईलवरून ट्रोल

जिमपासून ते लंच-डिनरपर्यंत, पापाराझी मलायकाला फॉलो करत असत तिचा प्रत्येक लुक कॅमेरात कैद करत असतात. नेटकरी बऱ्याचवेळा मलायकाच्या लुकची तर कधी तिच्या फिटनेस आणि फिगरची प्रशंसा करताना दिसतात. कधी कधी तिला यावरून ट्रोल देखील केले जाते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर नेहमी फॅशन सेन्स, फिटनेस कधी कपड्यावरून तर कधी चालण्यावरून चर्चेत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. पापाराझींची ती आवडती आहे. जिमपासून ते लंच-डिनरपर्यंत, पापाराझी मलायकाला फॉलो करत असत तिचा प्रत्येक लुक कॅमेरात कैद करत असतात. नेटकरी बऱ्याचवेळा मलायकाच्या लुकची तर कधी तिच्या फिटनेस आणि फिगरची प्रशंसा करताना दिसतात. कधी कधी तिला यावरून ट्रोल देखील केले जाते. काही दिवसांपूर्वीही ती तिच्या चालण्याच्या पद्धतीमुळे ट्रोल झाली होती.. मलायका अरोरा पुन्हा एकदा तिच्या जिम आउटफिट आणि वॉकिंग स्टाईलमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. मंगळवारी मलायका अरोरा योगासाठी जात होती. या दरम्यान तिने पापाराझींना म्हणजे माध्यमांना हाय केला आणि आत जाऊ लागली. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि नेटकरी तिला तिच्या चालण्यावरून व कपड्यावरून ट्रोल करत आहेत.

संबंधित बातम्या

व्हायरल भयानीने इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मलायका अरोरा गुलाबी स्पोर्ट्स ब्रा आणि हाफ पॅन्टमध्ये दिसत आहे. यासोबत तिने काळा मास्कही घातला आहे. मलायका हसत हसत आतमध्ये जाताना दिसत आहे. वाचा : गेल्यावेळी देखील मलायकाची चालण्याची शैली सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय झाली होती. यावेळीही नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या होत्या. काहींनी तिच्या चालण्याच्या पद्धतीची तुलान ‘डक’ म्हणजे बदकासोबत केली होती. तर एका नेटकऱ्यांने म्हटले आहे सेलेब्सना कपड्यांची अॅलर्जी असते काय ? तर दुसऱ्याने म्हटले आहे की, सेलेब्स ड्रेसिंग सेन्स नसतो का ..?..अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल केले आहे. वाचा : एका नेटकऱ्याने तर म्हटले आहे की, इंडिया नेक्स्ट सुपरमॉडलची जज आणि अशी का राहते. तर काहींनी हिच्याकडे दुसरे कपडे नाहीत का..असे म्हणत तिला ट्रोल केले आहे. मलायका फिटनेस फ्रीक आहे. आणि इन्स्टावर ती लोकांना योगा आणि फिटनेश किती गरजेचा आहे याबद्दल माहिती देत असते. अनेकांनी तिच्यापासून यासाठी प्रेरणा घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या