JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कोरोनामुळे शनाया जवळ बाळगतेय ही अत्यावश्यक गोष्ट, इन्स्टाग्रामवर शेअर केले PHOTO

कोरोनामुळे शनाया जवळ बाळगतेय ही अत्यावश्यक गोष्ट, इन्स्टाग्रामवर शेअर केले PHOTO

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री ‘इशा केसकर’ने तिची अत्यावश्यक गोष्ट कोणती आहे हे सांगणारे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जाहिरात

आपल्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणाऱ्या माझ्या नवऱ्याची बायको या मालेकीमधील नवी शनाया म्हणजेच इशा केसकर देखील तिचं पाककला कौशल्य दाखवणार आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 मार्च : देशभरात कोरोनामुळे जमावबंदी लागू झाली आहे. मुंबईमध्ये 31 मार्चपर्यंत लोकलसेवा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. जर नागरिकांनी बाहेर जाण्यावर रोख नाही आणली तर सरकारकडून याहीपेक्षा कठिण पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे. राज्यात 144 कलम लागू केल्यानंतर याचं अनेक ठिकाणी उल्लंघन होत आहे. तसंच कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढते संख्येमुळेही आता सरकार आणि प्रशासनासमोर आव्हान उभं राहिलं आहे. अशावेळी सरकारकडून घराबाहेर न पडण्याच्या आवाहनाबरोबरच अत्यावश्यक वस्तू जवळ बाळगण्याचं आवाहन केलं आहे. (हे वाचा- आणखी एक अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात, सोशल मीडियावर दिली माहिती ) अभिनेत्री इशा केसकर देखील सरकारच्या या आवाहनाचं काटेकोरपणे पालन करत आहे. तिने खूप Cute आणि मजेशीर पद्धतीने काही फोटो शेअर करत ‘अत्यावश्यक गोष्टी जवळ बाळगा’ असं आवाहन केलं आहे. तुमच्या लाडक्या शनायाची अत्यावश्यक गोष्ट जर तुम्हाला समजली तर तुम्हालाही हसू येईल. सोशल मीडियावर नेहमी अक्टिव्ह असणारी इशा ‘काहे दिया परदेस’ फेम ऋषी सक्सेनाला डेट करत आहे. तिने ऋषीबरोबरचे काही फोटो शेअर करत ‘अत्यावश्यक गोष्टी जवळ बाळगा’ असं सांगितलं आहे. (हे वाचा- भारतीयांसाठी प्रियंका चोप्राने थेट अमेरिकेतून वाजवल्या टाळ्या, VIDEO व्हायरल ) सध्या चित्रपट, मालिकांचे शूटिंग रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे होम क्वारंटाइनचे अनेक फोटो सिनेसृष्टीतील कलाकारांनी शेअर केले आहेत. ऋषी आणि इशा देखील एकमेकांबरोबर क्वारंटाइन टाइम एन्जॉय करताना दिसत आहेत.

हा फोटो शेअर करताना इशाने #gocorona असा हॅशटॅग तर वापरलाच आहे, पण त्याचबरोबर #phaktaprem आणि #premalafilternasava हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी त्यांची जोडी सगळ्यात बेस्ट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे, तर ‘सोशल डिस्टन्सिंग’ विसरले की काय अशी खोचक कमेंट देखील केली आहे. इशा केसकरसह अनेक सेलिब्रिटींनी घरातच राहण्याचा सल्ला त्यांच्या चाहत्यांना दिला आहे. सध्याची भीषण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी घराबाहेर न पडणं अत्यंत आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या