JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / वेब सीरिजच्या नावाखाली दिला धोका, पॉर्न साइटवर पोस्ट केला मॉडेलचा अश्लील VIDEO

वेब सीरिजच्या नावाखाली दिला धोका, पॉर्न साइटवर पोस्ट केला मॉडेलचा अश्लील VIDEO

वेब सीरिजच्या नावाखाली एका मुलीचा अश्लील व्हिडीओ बनवून तो पॉर्न साइटवर पोस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंदूर, 30 जुलै : लॉकडाऊनच्या काळात मनोरंजनाचे साधन म्हणून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वेब सीरिज आणि इतर कंटेट पाहण्यात आला. वेब सीरिज हे सध्याच्या काळातील वेगाने प्रसिद्ध होणारे करमणुकीचे साधन आहे. मात्र जसजसा लोकांचा याकडे कल वाढू लागला आहे,  तसा याचा गैरफायदा काही लोकं घेत असल्याच्या घटना समोर येत आहेत. वेब सीरिजच्या नावाखाली एका मुलीचा अश्लील व्हिडीओ बनवून तो पॉर्न साइटवर पोस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये अशाप्रकारे व्हिडीओ बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी शूटिंग प्रक्रियेमधील कास्टिंग डायरेक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. दैनिक भास्करने यासंदर्भात वृत्त दिले आहे. या मीडिया अहवालानुसार धामनोद याठिकाणी राहणाऱ्या एका तरुणीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. ही तरुणी मॉडेलिंगमध्ये तिचं करिअर बनवण्याच्या प्रयत्नात होती. तिने तिच्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, डिसेंबर 2019 मध्ये ब्रिजेंद्र नावाच्या एका व्यक्तीने तिला वेब सीरिजमध्ये काम देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तो तिला एका फॉर्म हाउसवर घेऊन गेला होता. (हे वाचा- रक्षाबंधन असो किंवा पार्टी! ‘Fashion Goals’ देणारे निया शर्माचे बोल्ड लुक्स ) ही तरुणी तिचा कास्टिंग डायरेक्टर असणाऱ्या मिलिंद या मित्राबरोबर फार्म हाऊसवर पोहोचली. ब्रिजेंद्रने तिला बोल्ड सीरिजमध्ये काम देण्याच्या बहाण्याने काही बोल्ड सीन शूट करायला लावले. यातील अश्लील दृश्य कापून ही सीरिज ओटीटीवर प्रदर्शित करण्याचे आश्वासन त्याने तिला दिले होते. कालांतराने या तरुणीच्या लक्षात आले की, पॉर्न साइटवर तिचा हा व्हिडीओ अश्लील दृश्यांसह रिलीज करण्यात आला आहे. (हे वाचा- छोट्या पडद्यावरची ‘बहू’ हिना खाननं केलं HOT फोटोशूट, बोल्ड फोटोची तुफान चर्चा ) तरुणीला तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडूनच माहिती मिळाली की तिचा व्हिडीओ पॉर्नसाइटवर पोस्ट करण्यात आला आहे. मात्र तोपर्यंत एकूण 4 लाख जणांनी हा व्हिडीओ पाहिला होता. तिने घाबरुन ब्रिजेंद्र आणि तिच्या कास्टिंग डायरेक्टर मित्राला फोन केला. पण त्यांनी तिच्या फोनकडे दुर्लक्ष केले. या तरुणीने कास्टिंग डायरेक्टरसह 5 जणांविरोधात तक्रार केली आहे. दरम्यान मिलिंदची सध्या चौकशी सुरु आहे, ब्रिजेंद्र मात्र अद्याप फरार आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या