JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / LGM Trailer: माहीची सिनेक्षेत्रात जोरदार बॅटिंग, पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर आऊट

LGM Trailer: माहीची सिनेक्षेत्रात जोरदार बॅटिंग, पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर आऊट

धोनीच्या लेट्स गेट मॅरिड नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला असून सोशल मीडियावर याचीच चर्चा आहे.

जाहिरात

कसा असणार आहे धोनीचा हा चित्रपट?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई11 जुलै- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनीचा चाहतावर्ग मोठा आहे. क्रिकेटमध्ये नाव कमावल्यानंतर आता धोनी सिनेमा जगतात देखील नशिब आजमवण्यासाठी सज्ज झाला आहे.धोनीच्या लेट्स गेट मॅरिड नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला असून सोशल मीडियावर याचीच चर्चा आहे. धोनीचा हा पहिला चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यापूर्वी खरं तर धोनीच्या आयुष्यावर देखील एक बायोपिक आला होता. त्यात बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंगनं धोनीची भूमिका साकारली होती. धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांनी केलाय हा चित्रपट प्रोड्युस धोनीच्या या चित्रपटाचा काल चैन्नईमध्ये एका कार्यक्रमामध्ये ट्रेलर लाँच करण्यात आला. त्याच्या ऑडिओचे देखील यावेळी लाँचिंग करण्यात आले. ही एक तमिळ फिल्म असून त्याचे दिग्दर्शन रमेश थमिलामानी यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये हरीश कल्याण आणि इवाना हे लीड रोलमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांनी प्रोड्युस केला आहे. वाचा- ‘माझ्या आयुष्यात आल्याबद्दल खूप आभार…’ स्पृहा जोशीची या व्यक्तीसाठी खास पोस्ट महेंद्रसिंग धोनी या चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहे. एप्रिल 2023  मध्ये ‘एलएजीएम’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते, तेव्हा धोनी म्हणाला होता की, हा चित्रपट प्रेक्षकांना आनंद देईल. एलजीएम’एक कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट आहे, जो सगळ्यांना आवडेल.

कसा असणार आहे धोनीचा हा चित्रपट? लेट्स गेट मॅरिड या चित्रपटाची कहाणी गौतम व मीरा या पात्रांभोवती फिरणारी आहे. गौतम व मीराचे एकमेकांवर खूप प्रेम असते. त्यामुळे दोघं लग्न करायचं ठरवतात, पण लग्नानंतर मीराला गौतमच्या आईबरोबर राहण्याची इच्छा नसते; त्यामुळे गौतम एक ट्रिप प्लॅन करतो. जेणेकरून त्याच्या आईचं आणि मीराचं नातं घट्ट होईल, असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

कधी होणार सिनेमा रिलीज? लेट्स गेट मॅरिड नावाचा चित्रपट हा 31 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. स्वत धोनी देखील त्याच्या या चित्रपटाविषयी खूपच उत्सूक आहे. त्यानं याविषयी सोशल मीडियावर काही पोस्ट देखील शेअर केल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या